कंधार ;ऐतिहासिक कंधार शहराच्या इतिहासात आपल्या कतृत्वावर आजरामर झालेले शौर्यवंत व्यक्तीमत्व वीर नागोजी नाईक चौकाची निर्मिती ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी केली.ही गटारगंगा रस्त्यावर वाहू लागतात माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेस विनंती अर्ज करुन कळविले होते.पण संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळेच या गटारगंगे कडे जाणुन बुजून दुर्लक्ष करीत आहे.ही खेदाची बाब आहे.ऊन्हाळ्यात सर्व नाल्यांची सफाई होणे गरजेचे होते.पण प्रशासन झोपेचे सोंग घेवून धृतराष्ट्र बनल्याने रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या
वाहन व नागरीकांना त्या गटारगंगेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एव्हढेच काय श्री शिवाजी विधी महाविद्यालय वीर नागोजी नाईक चौक कंधार येथुन बहाद्दरपुरा क्रांति नगरीकडे जाणारा “रस्ता खड्डेमय का?खड्ड्यात रस्ता “असे जनता-जनार्धन एकमेकात चर्चा करतांना दबक्या आवाजात करत आहेत.पण निगरगट्ट प्रशासन या प्रश्नांकडे लक्ष न देता.फक्त बघ्यांची भुमिका घेवून सदरील घटनकडे दुर्लक्ष करत आहे.प्रत्येक जण एकमेकांकडे दोषारोप करत ही समस्या सोडविण्या पेक्षा दुर्लक्ष करीत आहे.शहराकडून क्रांतिभुवन बहाद्दरपूरा कडे जाणार्या मार्गाच्या गटारावर एक छोटा पुल होता.त्या पुला खालून गटारगंगा ऊन्हाळ्यात व्यवस्थित वाहत होती.पण पावसाळारंभ झाल्याने बिचाऱ्या
नागरीकांना त्याचा त्रास होतो आहे.हा प्रश्न सोडवणे एका दिवसाचे पण उदासीन प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करून जनतेचा सुड घेत आहे.हे सर्व मतदारांनी मत कवडीमोलभावात विकल्यामुळे असे घडते आहे.
तेंव्हा उद्या सोमवारचा कंधारी बाजार आहे.बाजारात येणाऱ् नागरीक यांना त्रास होवूनये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी ही नम्र विनंती.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार