मा आमदार अविनाश घाटे यांना अखेर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर

′मा आमदार अविनाश घाटे साहेब व डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांना अखेर काँग्रेस पक्षाकडून देगलूर बिलोली विधानसभाव नायगाव विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे.यामुळे अनेक जणांच्या पोटात दुकने चालू झाले आहे, काही जणांनी तर वेगळाच दावा करीत असतात की या मतदार संघात बाहेरचा उमेदवार चालणार नाही, जे बाहेरून आले आहेत, स्थानिक नाहीत त्यांना जर का उमेदवारी जाहीर झाली तर आम्ही बंडखोरी करू अशी वाऱ्याची झुळूक वाहताना माझ्या निदर्शनास आले आहे.

परंतु अशा प्रकारे विधान करणाऱ्यांनी येवढे जरा भान ठेवले पाहिजे की, भारतीय संविधानात कलम नंबर 14 ते 18 मध्ये हक्क आणि कलम नंबर 51 क मध्ये कर्तव्याची तरतूद केलेली आहे. तर मग आपण आपले भाष्य करीत असताना जरा न्यायाच्या चौकटीत राहूनच भाष्य केले पाहिजे, कारण बाहेरचा उमेदवार चालणार नाही असे म्हणणे एकदम लाजिरवाणे बाब आहे कारण विधानसभेसाठी जो उमेदवारी मागत असतो तो सर्वप्रथम भारताचा नागरिक असला पाहिजे तर मग हे उमेदवार काय बाहेर देशातून आयात केले आहे का? तुम्हाला हक्क आहे, उमेदवारी मागण्याचा पण समाजातील काही तळहाताच्या बोटावर मोजण्याइतके, मोजक्याच व्यक्तींनी हक्क मात्र गाजवितात परंतु हक्कबरोबर आपली कर्तव्यही तितकीच महत्वाची असतात.पण कर्तव्याकडे लक्ष न देता नुसते हक्क गाजवीत असतात,

 

आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, समाजाप्रती काय कामे पार पाडली आहेत.समाज आपल्या कार्याचा विचार करून आपल्याला सहकार्य करतील आपण बोलले तसे वागलो का, त्यांना दिलेली वचणे योग्य वेळी, त्याचे पालन केले आहे का, यामुळे, माझ्यामुळे सर्व मतदार संघात कोणत्याही प्रकारची झळ न पोचता मी प्रामाणिकपणे कार्य केले आहे याकडे कोणीही लक्ष देत नसतात फक्त हक्क गाजवीत असतात , समाज काही वेडे नाही आता समाज जागा झाला आहे, जो सक्षम उमेदवार असेल, त्यांनाच पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी देत असते,

त्या उमेदवारांनी आपले आपले कामाच्या जोरावर कार्य करण्यासाठी पूर्ण अस्तित्व पणाले लावले आहे.म्हणून मी विजय जाधव आलुरकर सर्व मतदार वडीलधाऱ्या , बंधू भगिनींना , मित्र, मैत्रिणींना असे सांगू इच्छितो की, आपण आपल्या बुद्धीला पटेल असेच निर्णय घ्या ज्याप्रमाणे तलवार ही दोन्ही कामासाठी वापरली जाते, एक तर चांगल्या कामासाठी, नाहीतर बेईमान कामासाठी चागल्या कामासाठी वापरले तर चांगलेच काम होईल, आणि अयोग्य कामासाठी वापरली तर त्याचा सत्त्याणाश झाल्याशिवाय राहणार नाही तर मग विचार करून आपल्या तळहाताच्या पाठीमागील मनगटातील बळाच्या ताकदीने परिवर्तन घडून आणुया म्हणून मी विजय जाधव आलुरकर सांगतो की,

 

तुम्ही आपले निर्णायक मत आपल्याला पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर याला न विकता, जो आपला उमेदवार इमानदार आहे, प्रामाणिकपणे कार्य करतो, ज्यांच्यामध्ये समाजाप्रती काही तरी करण्याची नवी धमक आहे, चांगला उमेदवार म्हणजे जे निस्वार्थी, सुशिक्षित, प्रामाणिक असेल अशानाचा आपण वाव दिला पाहिजे. त्या उमेदवारांनी इच्छा शक्तीच्या बळावर विकासकामे खेचून आणुंन समाजात कोणत्याही प्रकारे भेदाबभेद न मानता विकास करेल त्यांनाच सहकार्य केले पाहिजे.पूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटले आहे की, लोकशाही मध्ये हक्काला खूप प्राधान्य दिले आहे,

पण या हक्कावर कोणी भेदभाव करून डावलण्याचा प्रयत्न करीत असेल तर या हक्काला काहीच अर्थ राहणार नाही.तर मग ज्याप्रमाणे हिंदीमध्ये काहावत आहे, बेईमान औंर अपराधी कभी नहीं सुधार सकता क्योंकी बेईमान औरं अपराध के किडे उसके खून मे होते है l म्हणून आपण जो निष्कलंक आहे, निरपराधी आहे, समाजाप्रती काहीतरी करण्याची ज्याच्यात तळमळ आहे, अशानाच दाद दिली पाहिजे.म्हणून मी विजय जाधव आलुरकर सर्वाँना पूनच्छ एकदा सांगतो की, मां आमदार अविनाश घाटे साहेबामध्ये व डॉ. मिनालताई खतगावकर पाटील यांच्यात वरील सर्व गुणाचा समावेश त्यांच्या कार्यातून नक्कीच आपल्याला दिसून येतो.म्हणून आपले मौल्यवान मत वाया न घालविता त्याचा योग्य रीतीने उपयोग होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.म्हणून देगलूर बिलोली विधानसभा, व नायगाव विधानसभा मतदार राजांनी आपले निर्णायक मत ठरवून अविनाश घाटे साहेब, व मिनलताई पाटील खतगावकर याणाच सहकार्य करावे* .

*धन्यवाद*.
*🙏आपलाच🙏*
*विजय जाधव आलुरकर.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *