आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते देवकीनंदन ठाकूर महाराज यांचे प्रतिपादन …,  देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सनातन बोर्ड निर्माण करणे आवश्यक.!_* 

 (*कंधार ; संतोष कांबळे )
सनातन धर्माच्या रक्षणासाठी सनातन बोर्डाच्या गठनाची गरज आहे हा बोर्ड सनातन संस्कृतीचे रक्षण करेल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल. वक्फ बोर्ड असू शकतो, तर सनातन बोर्ड का होऊ शकत नाही ?
       धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी सनातन बोर्डाचे निर्माण करणे आवश्यक आहे तसेच  धर्माची रक्षा करते वेळी काही बंधन आले,तर ते तोडून टाका व धर्माची रक्षा करा, असे आवाहन देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांनी श्री क्षेत्र उमरज येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा वाचन प्रसंगी दि २ मार्च रोजी  केले.
      पैसा सर्वस्व नाही,कुंटूबाला वेळ द्या तुमच्या मुलाबाळांना शिक्षण दया चांगले संस्कार द्या असे प्रतिपादन वृंदावनचे आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांनी श्रीक्षेत्र उमरज येथे आयोजित श्रीमद् भागवत कथेत केले.यावेळी हजारो भाविक भक्तांची उपस्थिती  होती.श्रीक्षेत्र उमरज संस्थानच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथेला सुरूवात दि. २७ फेब्रुवारी पासून  झाली आहे,देवकीनंदन ठाकूर महाराज यांच्या कथा श्रवणाला भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे,आपल्या रसाळ व मधाळ कथेतून त्यांनी तुमच्या लेकरांचे  पालन पोषण करता तसे धर्माचे पालन करणे  हे तुमचे कर्तव्य आहे.आईच्या चित्तात सदैव आपल्या लेकराचे हितच असते.केवळ आपल्या लेकराचे कल्याण व्हावे यासाठी रात्रंदिवस ती कष्ट करून त्याला जपत असते ती माता असते.वेळ प्रसंगी स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे यासाठी तळमळत राहणारी म्हणजे ती आई असते.
      त्याचप्रमाणे संतही वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालतात परंतु माणूस हा माणूस बनून राहिला पाहिजे आणि देवाचा लाडका झाला पाहिजे यासाठी रात्रंदिवस तळमळत असतात. आई आणि संत एकच असतात म्हणून देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांनी श्री क्षेत्र उमरज येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा वाचन करताना केले.
     
          
 श्रीक्षेत्र उमरज येथे  लातूरचे खासदार डॉ शिवाजीराव काळगे म्हणाले कि  उमरज देवस्थान ल क दर्जा मधून ब दर्जामध्ये नेण्याचा प्रयत्न  करीन व  येणाऱ्या काळात  सदरील कामासाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन लातूरचे खा.डॉ शिवाजीराव काळगे म्हणाले,यावेळी श्रीसंत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती महंत एकनाथ महाराज, मुखेड चे आमदार तुषार राठोड, कंधार लोहा मतदार संघाचे माजी आमदार मा.आ ईश्वरराव भोसीकर,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते ॲड.मुक्तेश्वर धोंडगे,माधवराव पेठकर,माजी नगरसेवक शोभाताई नळगे, माजी जि.प.सदस्य संध्याताई धोंडगे,माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, माजी सैनिक जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,माजी नगरसेविका वर्षाताई कुंटेवार,उमरजचे सरपंच जयश्री केंद्रे आदींसह हजारों भाविक भक्तांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *