कंधार : प्रतिनिधी
कंधार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष तथा पिटासन अधिकारी शहाजी नळगे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्यात कंधार नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी मन्नान चौधरी यांची बिनविरोध निवड तर कंधार नगरपरिषदेच्या स्विकृत सदस्य पद्दी महंमद हमीद सुलेमान (कॉंग्रेस )व स्वप्नीलभाऊ लुंगारे ( राष्ट्रवादी अजीत पवार गट) यांची निवड करण्यात आली.
कंधार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज 15 जानेवारी पिठासिन अधिकारी तथा नगराध्यक्ष शहाजी नळगे यांनी सर्वसाधारण सभा आयोजित केली यावेळी मुख्याधिकारी मुळे यांनी सभेला सुरुवात केल्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पहिली सभा संपन होऊन त्यात उपनगराध्यक्ष निवडीचा ठराव घेण्यात आला व मन्नान चौधरी यांचा सर्वानुमते उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच स्वीकृत सदस्यांमध्ये काँग्रेसकडून हमीद सुलेमान यांचे नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक स्वप्निल पाटील लुंगारे यांचे नाव जाहीर करण्यात आले. या निवडीबद्दल सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी सर्व नगरसेवकाची उपस्थिती होती.
कंधारच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन नगराध्यक्ष शहाजी नळगे यांनी केले तर उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी यांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त करून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे आभार मानले तर कंधारकरांच्या कामासाठी सदैव येथील संपर्क कार्यालयात चोविस उपलब्ध राहील व जनतेचे सेवा करेल असे आश्वासन समाज माध्यमांशी बोलताना मन्नान चौधरी यांनी दिले. कंधार नगर पालिकेसमोर फटाके फोडून या निवडीचा जल्लोष करण्यात आला.


