धर्मापुरी ता परळी वैजनाथ ( प्रा भगवान आमलापुरे )
येथून जवळच असलेल्या मौजे हेळंब येथे आज शुक्रवार दि १६ जाने २६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता कै शं गु ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विशेष निवासी रासेयो विशेष निवासी शिबीराचे उद्घाटन आयोजित केले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केले आहे.
गावच्या विकासासाठी रासेयोची हाक…..त्या हाकेस सर्व गावकऱ्यांची साथ ही या वर्षीची रासेयो शिबीराची थिम आहे.सकाळी ११:०० वाजता सुरू होणाऱ्या या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा डॉ शिवाजीराव गुट्टे,आण्णा आहेत.
उद्घाटन समारंभात प्रा डॉ व्ही जी कळलावे , जिल्हा समन्वयक, रासेयो बीड, आणि प्रा डॉ एस सी जाधवर , योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ ताराचंद होळंबे, मा श्री अल्फेश का लांडगे, सरपंच हेळंब आणि मा श्री मधुसूदन ना होळंबे, उपसरपंच हेळंब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. रासेयो विशेष निवासी शिबीर दि २२ जाने २६ पर्यंत चालणार आहे.उद्घाटन समारंभाला रासेयो स्वंयसेवक आणि गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा गोविंदराव मुंडे, प्रा डॉ कावळे एस टी आणि प्रा डॉ सौ मुंडे एस डी यांनी केले आहे.

