filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8388608;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 40;
कंधार : (दिगांबर वाघमारे )
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी ३५० वा “हिंद-दी-चादर “शहीदी समागम निमित्य कंधार गटसाधन केंद्र येथे तालुकास्तरीय वृक्तत्वस्पर्धा,निंबध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,गायन स्पर्धा दि.16 जानेवारी संपन्न झाल्या असून कंधार तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
गटशिक्षणाधिकारी वसंत मेटकर यांच्या हस्ते दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कंधार तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण पाटील, केंद्रप्रमुख विश्वाभर मटके, केंद्रप्रमुख बालाजी निवळे,ओमप्रकाश येरमे,सिध्देश्वर मलगीरवार, शिवाजीराव डिकळे,राजेश बिरादार, बालाजी वडजे, भास्कर पाटील कळकेकर,हरीभाऊ चिवडे,राजहंस शहापुरे,दिगांबर वाघमारे,महमंद अनसारोदीन,मारोती चिलपिंपरे, सुभाष मुंडे,महमंद जमील,शिवकुमार बच्चूवार,मिर्झा जमीर बेग आदीसह सहभागी स्पर्धेक,शिक्षक उपस्थित होते.
वकृत्व स्पर्धेत: प्रथम क्रमांक कु. सानिया शेख (माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर ) तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरा येथील फायजा शेख या विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासुळ येथील नुजत अस्लाम शेख हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्या स्पर्धकांना दिनांक 20 जानेवारी रोजी गुरुग्रंथ साहेब जी भवन सचखंड शाळेच्या जवळ हिंगोली गेट नांदेड येथे होण्या जिल्हास्तरीय स्पर्धेला ते पात्र ठरले आहेत. तसेच
निबंध स्पर्धेत: नेहरूनगर आश्रम शाळेतील विद्यार्थी प्रताप जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर जिल्हा परिषद हासूळ ची कु. ऋतुजा यादव यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
गायन स्पर्धेत : नेहरूनगर आश्रम शाळेची कु. अंजली पवार हिने प्रथम क्रमांक तर महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार ची कु. साईली वसंत आडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
चित्रकले स्पर्धेत :प्रथम क्रमांक पीएम श्री जि प हायस्कूल पेठवडज येथिल माशिका माधव कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा कवठा येथील नेहा केशव जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे आणि जिल्हा परिषद मोहिजा येथील सीमा आयूब पठाण हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
#हिंददीचादर #श्रीगुरुतेगबहादूरसाहिबजी #३५०वाशहीदीसमागम #धर्मरक्षण #अमरबलिदान #मानवतेचा_संदेश #श्रद्धाआणिसमत्व #GuruTeghBahadurJi #hindkichadar

