मुंबई ; (प्रतिनिधी)
देशातील महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना करणारे हाथच तोडून टाका येणारा न्यायालयीन खर्च आम्ही करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक व पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटने केंद्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला.
देशातील महामानवांच्या पुतळ्यांच्या विटंबनेत वाढ झाली असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना सर्रास केली जात आहे.
यामागचा सूत्रधार शोधणे आवश्यक असून अश्या विकृतीमुळे समाजात तेढ निर्माण होऊन राष्ट्राची एकता व अखंडता बाधित होन्याची शक्यता नाकारता येणार नाही शिवाय धार्मिक वाद सुद्धा फोफाऊ शकतो.
असे वाद व विटंबना थांबवण्यासाठी पुतळ्याजवळ सार्वजनिक वाचनालय उभारून पुतळ्याच्या जागेची स्वच्छता व निगा राखावी तसेच ग्रामीण भागात पुतळा कमिटीच्या वतीने 4 तरुण श्रमदानातून पुतळा संरक्षणासार्थ उभा करावेत ज्यामुळे अश्या प्रकारावर प्रतिबंध होण्यास मदत होईल. पुतळे उभारून त्या पुतळ्याची निगा राखणे सुद्धा पुतळा समितीचेच परम कर्तव्य असायला पाहिजे.
किंबहुना देशातील कोणत्याही महामानव महानायिका यांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या हातांना कलम करावेत व पोलिसात द्यावे, शिवाय कलम करणाऱ्या शूरविरावर होणाऱ्या न्यायालयीन बाजूचा लढा पँथर ऑफ सम्यक योद्धा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने लढण्यात येऊन परिवारासह न्यायालयीन आर्थिक भार उचलण्यात येण्याची ग्वाही दिली तर असा विकृत समोर आला तर हातपाय तोडून संविधानिक लढा स्वतःच्या बचावासाठी मी लढेंन असेही पँथर डॉ माकणीकर यांनी सांगितले.
आंबेडकर भवन, भीमा कोरेगाव,
राजगृह वरील भ्याड हल्ला व झालेल्या पुतळा विटंबना प्रकरणी पोलिसांद्वारे काय कारवाई करण्यात येऊन आरोपी व खरा सूत्रधार कोण (?) याबद्दल पूज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी नेतृवाखाली श्रावण गायकवाड, वीरेंद्र लगाडे, राजेश पिल्ले, सचिन भूटकर आदी पँथर्सचे शिस्तमंडळ संबंधित पोलीस ठाण्यातुन तपास अहवाल मागवत असल्याचेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.