लोहा / प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील शिक्षकाचे वेतन दिवाळी पूर्वी आदा करावे अशी मागणी शिक्षक काँग्रेसच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुढे निवेदनात असे नमूद केले की, नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकाचे माहे ऑक्टोबर 2020चे वेतन व दिवाळी अग्रीम दिवाळी सणाच्या अगोदर द्यावे.
मागील काही महिन्यांपासून वेतन 25 ते 30 तारखेपर्यंत होत आहे.दिवाळी 12 नोव्हेंबर पासून आहे त्यामुळे सर्व शिक्षकांचे वेतन आॅक्टोंबर 2020 चे दिवाळी अग्रीम 6 नोव्हेंबर पर्यंत करावे अशी मागणी शिक्षक काँग्रेस च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर शिक्षक काँग्रेसचे राज्यकोषाध्यक्ष प्रकाश मुंगल मराठवाडा अध्यक्ष विठ्ठूभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कल्याणकर , जिल्हा सल्लागार बाबुराव कैलासे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.