लोह्यात काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद
लोहा/ प्रतिनिधी
केंद्रात व राज्यात काँग्रेस सत्तेत आल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते नरेंद्र दादा चव्हाण यांनी लोहा येथे काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने नुकतेच पारित केलेले कृषी व कामगार विधेयक मागे घ्यावे यासाठी काँग्रेसच्या वतीने हे विधेयक मागे घेण्यासाठी स्वाक्षरी मोहिम कार्यक्रमात लोहा येथे केले.
दि.२७ रोजी लोहा येथे मंगळवारी आठवडी बाजाराच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने नुकतेच संसदेमध्ये बहुमताच्या जोरावर पारित केलेले शेतकरी व कामगार विरोधी कृषी व कामगार विधेयक मागे घ्यावे
यासाठी स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
सदरील स्वाक्षरी मोहिमेचे काँग्रेसचे युवा नेते नरेंद्र दादा चव्हाण व युवा नेते राहुल भैय्या हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल मोरे,
माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, माजी बांधकाम सभापती पंकज परिहार, माजी नगरसेवक अनिल दाढेल, शेरफोदीन शेख, , माजी पं.स. सदस्य डॉ. गवळी, उपसरपंच मधुकर पाटील दिघे , युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर, शाम पाटील नळगे, पांडुरंग दाढेल ,भुषण दमकोंडवार, गजानन कळसकर ,विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी कपाळे , शिवाजी मुंडे आदी उपस्थितीत होते.
यावेळी पुढे बोलताना युवा नेते नरेंद्र दादा चव्हाण म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी आहे काँग्रेसच्या काळामध्ये शेतीमालाला भाव होते महागाई नव्हती आता शेतीमालाला भाव नाही काँग्रेसच्या काळामध्ये सोने २४ हजार रुपयाला तोळे होते आता भाजपच्या काळात ५१ हजार रुपयाला तोळे झाले. बियाणाचे ,खतांचे भाव वाढले तर सोयाबीनचे आदी पिकांचे भाव कमी झाले . तेव्हा आता शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार आले पाहिजे असे नरेंद्र दादा चव्हाण म्हणाले.
लोहा येथील काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे
लोहा-कंधार विधानसभा मतदार संघातून दहा हजार शेतकरी व शेतमजूर यांच्या सह्या घेण्यात येणार असुन आज दिवस अखेर ७०० शेतकरी व शेतमजूर यांच्या सह्या घेण्यात आल्या असल्याचे व हा उपक्रम संपुर्ण मतदार संघात राबविण्यात येणार असल्याचे लोहा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी सांगितले.