नांदेड दि.३० लोकसभा निवडणुकीत अचानक वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक लढविलेले प्रा.यशपाल भिंगे यांनी आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला आहे अशी प्रतिक्रिया पीआरपीचे राज्य उपाध्यक्ष नगरसेवक बापूराव गजभारे यांनी दिली .
विधान परिषद सदस्य पदा करीता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येणाऱ्या यादीत त्यांचे नाव असल्याच्या चर्चे संदर्भात गजभारे म्हणाले की, भिंगे सारख्या विश्वासघातकी माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापिही आमदारकी देणार नाही. जर त्यांनी भिंगेना संधी दिलीच तर आंबेडकरी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पासून दूर जाईल. लोकसभा निवडणुकीत धनगर, हटकर समाजाने प्रा.भिंगे यांनानाकारले होते.त्या समाजातील जाणकार मंडळींचे म्हणणे होते की, अशोक चव्हाण यांची मते कमी करण्यासाठी भिंगेना उमेदवार करण्यात आले व त्यांना मोठी रसद पुरविण्यात आली असे आरोप झाले होते पण या आरोपाकडे दुर्लक्ष करून आंबेडकरी जनतेने त्यांना भरभरून पूर्ण मतदान केले निवडणूक संपल्यानंतर भिंगे यांनी समाजाचा विश्वासघात केला त्यांनी पूर्णपणे आंबेडकरी जनतेकडे पाठ फिरवली. कांहीचा फायदा झाला पण सामान्य माणसाला काय मिळाले तर फक्त अशोकराव चव्हाणांची नाराजी राज्यातील मोठ्या नेत्याला आमच्या चुकीच्या निर्णया मूळे पराभव स्वीकारावा लागला हे शल्य समाजात आहे निवडणुकीतील अघोरी जात प्रथा आणि स्वार्थीपणा मुळे समाज भरडला जात असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. पुढच्या निवडणुकात आंबेडकरी समाज निर्णायक भूमिकेत असेल असे गजभारे म्हणाले.