विलास मुंगे यांचे अधुरे राहिलेले काम पुढे नेणार – इंजि. विश्वजित

नांदेड – रेल्वे एस.सी,एस.टी अधिकारी कर्मचारी संघटनेचे नेते कालवश विलास मुंगे यांचे अधुरे राहिलेले काम पुढे नेण्याचा संकल्प इंजि. विश्वजित मुंगे यांनी केला. शहरातील श्रावस्ती नगर भागातील म. जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयात विलास मुंगे यांना अभिवादन कारण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिगंबर हनुमंते राहुल बहादूर, विक्रम मुंगे, पंचशील जमदाडे देविदास खंदारे, शैलेश जोंधळे, गौतम गायकवाड यांची उपस्थिती होती.
      प्रारंभी विलास मुंगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित अभिवादन सभेत बोलतांना इंजि.विश्वजित मुंगे म्हणाले कि,
विलास मुंगे यांनी वडील म्हणून दिलेले संस्कार व शिकवण याचे आयुष्य भर जतन करेल व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाईल असे अभिवचन  इंजि. विश्वजित मुंगे यांनी दिले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत श्याम निलंगेकर, संजय वाघमारे, सुभाष लोखंडे, राहुल गायकवाड यांनीही आपले विचार मांडले. यावेळी विद्यार्थ्यांसह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *