नांदेडच्या बौद्ध उपासक उपासिका भूतान धम्माभ्यास दौऱ्याकरिता रवाना 

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो आणि शहर व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका हे भूतान आणि दार्जिलिंग धम्माभ्यास दौऱ्याकरिता हुजुरी साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरुन रवाना झाले. यावेळी भिक्खू संघासह अनेकांची उपस्थिती होती.
या निमित्ताने  भूतान व दार्जिलिंग येथील ऐतिहासिक तथा धार्मिक स्थळांचा अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात आली.
              
      भूतान देशातील  अनेक ठिकाणांचा व दार्जिलिंग येथील प्रेक्षणीय स्थळे यांचा धम्माभ्यास करण्यासाठी नांदेड रेल्वे स्थानकावरुन बौद्ध उपासक उपासिका रवाना झाले आहेत. हा दौरा १७ मे पर्यंत चालणार आहे. यात भूतान व दार्जिलिंग येथील सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक इतिहासही अभ्यासला जाणार आहे. या दहा दिवसांच्या दौऱ्यात भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह राजेंद्रकुमार टोके, पद्मीन सदावर्ते,  शारदा थोरात, सुप्रिया पेडगांवकर, सुमन पंडित, नागोराव कोकाटे, शिला कोकाटे, कल्पना घोगडे, चंद्रकांत पंडित, वंदना पंडित, राजश्री सूर्यतळ, शिवगंगा वाटोडे, बापुराव वाटोडे, कमल सूर्यतळ, गोविंद सूर्यतळ, ज्ञानेश्वर घोडगे, नाथा पंडित हे बौद्ध उपासक उपासिका सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *