हाळदा:
हाळदा नगरीचे भूमिपुत्र आणि विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता तथा प्रदेश सरचिटणीस अभिजीत हळदेकर यांनी नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हाळदा ता.कंधार येथील गरजू, वयोवृद्ध स्त्री-पुरुषांना ब्लँकेटचे वाटप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे व कंधार काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते सनदी अधिकारी व अभिनेते एकनाथ उर्फ अनिल मोरे यांचे शुभहस्ते एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्तात्रय शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल भाऊ पावडे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक संदीप सोनकांबळे, नगरसेवक प्रतिनिधी दीपक पाटील, ज्येष्ठ साहित्यिक जगन शेळके, उपसरपंच सचिन शिंदे, बाबाराव पाटील शिंदे, आत्माराम वगावाड, गणेश पवळे चिखलीकर, देवराव पांडागळे, कमलाकर शिंदे, सतीश देवकते,अशोक चिखलीकर ,बालाजी कपाळे,स्वप्निल परोडवाड, ऋषिकेश बसवंते,राजमुद्रा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी शिंदे,आदींची उपस्थिती होती.
अभिजीत कांबळे यांनी कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात गोरगरीब आणि गरजू लोकांना अनेक अर्थाने मदत केली असून अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ही सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब व वृद्ध स्त्री-पुरुषांना आज ब्लँकेटचे वाटप केले ही बाब अत्यंत अभिनंदनीय असून अशा सामाजिक उपक्रमातून माणसाला नवी दृष्टी मिळत असते. असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते अनिल मोरे यांनी व्यक्त केले.
अभिजीत हळदेकर यांनी घेतलेला हा ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असून आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेला हा कार्यक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी असून अभिजीत हळदेकर हे निश्चितच गौरवासपात्र असल्याचे मत काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बालाजीराव पांडागळे यांनी व्यक्त केले. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पावडे ,नगरसेवक संदीप सोनकांबळे ,दीपक पाटील, जगन शेळके, बाबाराव पाटील शिंदे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून अभिजित हळदेकर यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अभिजीत हळदेकर यांनी केले सूत्रसंचालन शहाजी पाटील शिंदे तर आभार नितेश पाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप कांबळे, पंकज जाधव ,गंगाधर आडेराव, नरेश दूधंबे,खंडू तोंडचोरे, संकेत यलतवार, नितीन कांबळे, ऋषिकेश भाग्यवंत,ज्ञानेश्वर कांबळे, अजिंक्य हाळदेकर आदींनी परिश्रम घेतले.