सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून उस्मानगर ग्रामीण उपरुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

कंधार ;प्रतिनिधी

तालुक्यातील उस्माननगर ग्रामिण उपरुग्णालयात दि.३० रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून अविनाशभाऊ आंबटवार यांच्या तर्फे फळें व शालेयसाहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कंधार पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीताई व्यंकटराव पाटील घोरबांड, एनएसयूआय विद्यार्थी आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर पाटील शिंदे, युवक कॉंग्रेस विधानसभा उपाध्यक्ष देवराव पांडागळे,दलितमित्र माधवराव आंबटवार,रामभाऊ सोनसळे, राहुल गांधी विचारमंच जिल्हाध्यक्ष अशोक पाटील चिखलीकर, त्र्यंबक पाटील लडकेकर,महेंद्रभाऊ कांबळे, संदीप पाटील काळम,निरंजन वाघमारे,कमलाकर शिंदे,संजय आंबटवार,दिगंबर आंबटवार ,तेजश भिसे,गजानन कुदे व आरोग्य अधिकारी डॉ सावंत यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *