साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
परभणी ; सय्यद हबीब
जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकिय व अभियांत्रिकी उत्तीर्ण इत्यादीकरीता महामंडळाकडून सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज दि.10 ऑगस्ट 2020 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. जेष्ठता व गुणानुक्रमांकानूसार 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनूसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शिधापत्रिका, आधारकार्ड, टिसी, गुणपत्रक, दोन छायाचित्र आणि पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी दोन प्रतीत आपल्या पुर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी येथे सादर करावेत. असे जिल्हा व्यवस्थापक, परभणी यांनी कळविले आहे.