गंदगी मुक्त भारत अभियानात सहभागी व्हावे — मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे आवाहन

गंदगी मुक्त भारत अभियानात सहभागी व्हावे — मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे आवाहन


कोल्हापूर, 

 स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात गंदगी मुक्त भारत  हे वर्तन बदल अभियान राबविले जात आहे. अभियानांतर्गत ८ ते १५ ऑगस्ट २०२० या कालावधीत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या अभियानात जिल्ह्यातील जनतेने सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत  ग्रामपंचायत स्तरावर सिंगल युज प्लास्टिक संकलन मोहीम राबविणे, गावामध्ये स्वच्छता श्रमदानातून  सार्वजनिक ठिकाणे, इमारती यांची स्वच्छता करणे, ODF Plus मोबाइल अप्लिकेशनची माहिती देऊन जनजागृती करणे, स्वच्छता संदेश व भित्तिचित्रे रेखाटने, गावस्तरावर वृक्षलागवडीसाठी श्रमदान करणे, विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची – ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित करणे (इयत्ता ६ वी ते ८ वी ),  निबंध स्पर्धा (इयत्ता ९ वी ते १२ वी )  तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वछता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे, ग्रामसभेमध्ये गाव ODF Plus घोषित करणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत. हे अभियान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यिात येणार आहे. कोविड -१९ च्या प्रादुर्भावाचा विचार करून हे अभियान यशस्वी करणेसाठी सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमन मित्तल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *