गुणवंत विद्यार्थ्यांचा सादलापूरे परिवाराकडून आर्थिक भेट देऊन गुणगौरव


फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

        कंधार तालुक्यातील फुलवळ येथील श्री बसवेश्वर विद्यालयातून इयत्ता दहावीमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कै.कृष्णाबाई संभाजी सादलापूरे यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आर्थिक भेट, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सादलापूरे परिवाराच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.

         नुकताच दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात श्री बसवेश्वर विद्यालयातून ८८.६० % गुण घेऊन प्रथम आलेल्या कु.शिवकन्या विश्वांभर बसवंते यांना ५५५१ रुपये, तर ८८.२० % गुण मिळवून द्वितीय आलेले आसिफ गफार बिच्छू व ८७.२० % गुण घेऊन तृतीय आलेल्या सुमेध आनंदा वाघमारे यांना प्रत्येकी २५५१ रुपये, शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सन्मान करून पाठीवर शाबासकीची थाप देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यापुढेही अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा माता कै.कृष्णाबाई संभाजी सादलापूरे यांच्या चरणी श्री बसवेश्वर संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ सादलापूरे यांनी व्यक्त केली.   

  यावेळी ज्येष्ठ नागरिक बाबुराव सादलापूरे, खमरोद्दीन बिच्छू, लक्ष्मण महाराज स्वामी, मुख्याध्यापक बी.एन.मंगनाळे, कमलबाई, वंदनाबाई सादलापूरे, माधव सादलापूरे, विजय सादलापूरे, डॉ.प्रकाश सादलापूरे, सुनील सादलापूरे, नागेश सादलापूरे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *