नांदेड ;
नंदकिशोर गायकवाड यांचा कोविड 19 समुपदेशन अधिकारी म्हणून गौरव प्रमाणपत्र देवून करण्यात आला. कोराना या साथीच्या रोगाच्या कालावधीत नांदेड शहर व परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये साथीच्या रोगाचा इतरत्र फैलाव होऊ नये म्हणून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचे समुपदेशन करून समुपदेशन अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडले म्हणून या प्रशंसनीय कार्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड च्या वतीने जिल्हा प्रशासनाने सन्मानपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला.नंदकिशोर गायकवाड यांचा सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.