मुखेड ; मुस्तफा पिंजारी
नांदेड जिल्ह्यातील ए.एन.एम जि.एन.एम नर्सेसना न्याय मिळवून देण्यासाठी
अहोरात्र लढत राहिन व न्याय देण्यासाठी रस्त्याच्या उतरेल, अशी प्रतिक्रिया आदी बनसोडे यांनी दिली.तसेच उपजिल्हाधिकारी डॉ सचिन सल्लाळ व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांचे आभार मानले.
नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोव्हिड सेंटर तर चालु होतं होते पण तिथे काम करणारा वर्ग खुपच कमी, केद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार कोव्हिड मध्ये पदभरतीची सुरुवात झाली,मुलाखतीही झाल्या व निवड लिस्टही लागली, पण तिन महिन्यांपासून लिस्ट लागुन नर्सिंग स्टाॅफना बोलवण्यात आले नव्हते, हजारो नर्सेस परेशान आर्डर कधी देतील, कधी बोलावतील, कधी कोव्हिड विरुद्ध लढु या आशेने वाट पाहत असे,पण काहीच मार्ग सुचेना, मग एक पर्यायी मार्ग म्हणून युनायटेड नर्सेस असोसिएशन नांदेड या घटनेची सखोल अभ्यास केला,पण माहिती अर्धवटच भेटु लागली, त्यानंतर नर्सेसचे अध्यक्ष आदी बनसोडे यांनी उपजिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून चर्चा करुन लेखी निवेदन दिले.
या घटनेची सर्व सोशल मीडियावर व्हायरल, न्युज पेपर, आमदार खासदार बांधकाम मंत्री यांच्या पर्यंत पोहचून सर्वांनकडुन सकारात्मक पाठिंबा भेटला.ए.एन.एम व जि.एन.एम नर्सेस साठी निवेदन दिले व काही दिवसांत सर्व नर्सेसना आर्डर भेटली नौकरी भेटली.तरी आदी बनसोडे यांनी केलेल्या कार्याची माहिती पाहुन महाराष्ट्रातील नर्सेस कडुन कौतुक होत आहे.