पानशेवडी येथे वीज पडून एक भाऊ ठार तर दुसरा गंभीर जखमी.

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

आज ता. ११ जुलै रोजी दुपारी अचानक सुरुवात झालेल्या धुवाधार पावसात वीज कोसळून कंधार तालुक्यातील पानशेवडी अंतर्गत असलेल्या गणातांडा येथील दिनेश केशव पवार वय २७ वर्ष ठार झाला असून त्याचाच भाऊ संदीप केशव पवार हा गंभीर जखमी झाला आहे.

गणातांडा येथील दिनेश पवार आणि संदीप पवार हे दोघे भावंड शेती कामासाठी शेतात गेले असता आज दुपारी अचानक सुरू झालेल्या पावसात येथे वीज त्या भावंडांच्या अंगावर कोसळली आणि त्यात दिनेश व संदीप हे दोघेही गंभीर जखमी झाले. तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आंबूलन्स ने या दोघांनाही कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण त्यात दिनेश मृत झाल्याचे घोषित करण्यात आले . आणि संदीप हा जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

वृत्त लिहेपर्यंत दिनेश चा मृत देह हा शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आल्याचे सोबतच्या गावकऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *