समाजसेविका सौ.आशाताई शिंदे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने – अभिजीत कांबळे हळदेकर


आमच्या हाळदा नगरीचे भूषण आणि कंधार लोहा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार, महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनात अत्यंत उच्च पदावर महाराष्ट्राची सेवा करत सामान्य माणसाचा विचार करत काम करणारे आमच्या हाळदा नगरीचे भूषण आमदार शामसुंदर पाटील शिंदे यांच्या सुविद्य पत्नी आणि वक्तृत्व,नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या गुणाची शिदोरी पाठीशी घेऊन कंधार- लोहा तालुक्यातील सामान्य माणसाच्या कल्याणासाठीचा आणि त्यांच्या सज्जगतेचा विचार करत आपल्या नेतृत्वाने संबंध मन्याड खोऱ्यात आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या आमच्या हाळदा नगरीच्या रणरागिनी आणि कंधार -लोहा तालुक्यातील समाज प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीत आपले योगदान देत सामान्य माणसासाठी अत्यंत निष्ठापूर्वक काम करणाऱ्या समाजसेविका सौ.आशाताई श्यामसुंदर पाटील शिंदे यांनी अवघ्या काही दिवसातच आपल्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.


स्वर्गीय गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या संस्कारात वाढलेल्या आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आयुष्यभर आचरणात आणलेले स्वर्गीय दगडोजी पाटील शिंदे हाळदेकर यांच्या संस्काररुपी वृक्ष छायेखाली आपलं कर्तृत्व सिद्ध करत सौभाग्यवती आशाताई शिंदे यांनी आपले वडिल स्वर्गीय गोविंदराव पाटील चिखलीकर आणि सासरे स्वर्गीय दगडुजी पाटील शिंदे यांचे संस्कार आज ते आपल्या मतदार संघात सिद्ध करताना दिसतात. याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आणि गर्व वाटतो.


खरंतर हाळदा हे गाव अध्यात्म, समाजकारण आणि राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटविणारं आमचं हे गाव या गावाने अध्यात्माची संस्काररुपी शिकवण दिली आहे. याच मातीने आणि हाळदा या गावाने अनेक प्रशासकीय अधिकारी,लढवय्ये कार्यकर्ते आणि निष्ठापूर्वक समाजाच्या उत्थानासाठी काम करणारे कर्मचारी आणि समाज बांधणीच्या पायाभरणीसाठी संस्कारक्षम काम करणारे समाजसेवक,गावावर आणि गावच्या मातीवर जिवापाड आणि निष्ठापूर्वक प्रेम करणारे तरुण युवक हाळदा नगरीच्या मातीने घडविले आहे. अध्यात्म,समाजकारण आणि राजकारणात गुण्यागोविंदानं नांदणार हे गाव आहे.या गावाने ह भ प वटेमोड महाराज यांच्या अध्यात्माने पावन झालेल्या या नगरीला अनेक संस्कारक्षम वसा आणि वारसा जपत समाजसेविका सौ.आशाताई शिंदे ह्या गोरगरीब,उपेक्षित,वंचित आणि सामान्य माणसाच्या कल्याणाचा सातत्याने विचार करत आपली घोडदौड त्यांनी खेड्या पाड्यापर्यंत पोहोचती करत आहेत. खरंतर मुंबईसारख्या अत्यंत उच्चभ्रू शहरात सर्व सुखसोयींनी युक्त असलेल्या परिवारात सबंध आयुष्य गेलं असताना आजही त्या आपल्या मातीचा गंध मनात घेऊन त्या वाडी तांड्यावरील सामान्य माणसाचा विचार करत त्यांच्या भल्यासाठी काम करताना दिसतात श.ही अत्यंत गौरवाची बाब आहे.


सौ. आशाताई शिंदे ह्या आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहून समाजकारण-राजकारणामध्ये आपले मोठे योगदान त्या आज देत आहेत. ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
आज सौभाग्यवती समाजसेविका सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस… वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप आभाळभर शुभेच्छा आणि शुभकामना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *