प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या कडून पवार कुटुंबियांना मदतीचा हात


कंधार ; प्रतिनिधी


कंधार तालुक्यातील गनातांडा येथील दिनेश पवार यांचा वीज पडून मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना भाजपा महिला मोर्च्या च्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली
कंधार तालुक्यातील गनातांडा पानशेवडी येथील रहिवाशी दिनेश केशव पवार यांचा अंगावर वीज पडून मृत्यु झाला त्याच्या कुटुंबियांना चिखलीकर परिवाराच्या वतीने मदतीचा हात देण्यासाठी भारतीय जनता पक्ष महिलामोर्च्या च्या प्रदेशउपाध्यक्षा तथा जि प सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी पवार कुटुंबियांचे सांतवन करून आर्थिक मदतीचा हात देत चिखलीकर परिवार तुमच्या दुःखात सदैव सोबत असल्याच्या भावना प्रणिताताईंनी यावेळी व्यक्त केल्या .

यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस किशनराव डफडे,भाजपा शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,शिक्षक आघाडीच्या तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,मधुकर डांगे,बालाजी तोटावाड,अड सागर डोंगरजकर,रमेश पाटील मोरे,गोविंद मोरे,अविनाश गित्ते,रजत शहापुरे,प्रकाश घोरबांड, उमेश भूरेवार,श्रीराम जाधव,कोंडीबा मोरे,नीलकंठ तेलंग शेख शादुल आदींची उपस्थिती होती

 शाहिद ज्ञानेश्वर डुबुकवाड यांच्या कुटुंबियांची भेट

कंधार
बचोटी ता कंधार येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर पांडुरंग डुबुकवाड यांचे नुकतेच निधन झाले ,ज्ञानेश्वर
डुबुकवाड यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी भाजपा महिलामोर्च्या प्रदेशउपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी त्यांच्या घरी भेट देऊन ,देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव करून शाहिद ज्ञानेश्वर डुबुकवाड यांना श्रद्धांजली अर्पित केली व त्यांच्या कुटुंबियांचे सांतवन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *