संजय भोसीकर यांच्या कडून विज पडून ठार झालेल्या दिनेश पवार यांच्या कुटुंबियाचे सात्वंन

कंधार (प्रतिनिधि)

कंधार तालूक्यातील पानशेवडी येथे रविवारी दि.११ जूलै रोजी विजेच्या कडकडाटा सहित पाऊस झाला यात पानशेवडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गणा नाईक तांडा येथील शेतकरी दिनेश केशव पवार वय २३ वर्ष यांच्या अंगावर वीज कोसळून जागीच म्रृत्यु झाला. जिल्हा कांग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी गणा नाईक तांडा येथे भेट देऊन पवार कुटूंबिया चे सात्वन करून धीर देत सामाजीक बांधीलकी जोपासत आर्थिक मदत करत मदतिचा हाथ दिला.

या वेळी हणमंतराव पाटील पेठकर, सूर्यकांत गुरुजी मोरे, पंढरी पाटील मोरे,जयराम पाटील मोरे,जळबा पाटील मोरे, कोंडिबा पाटील मोरे आदिंची उपस्थिति होती दिनांक 11 जुलै रोजी पानशेवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला या पावसामध्ये शेतात असलेले तरुण शेतकरी दिनेश पवार यांच्यावर वीज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे गणा तांडा येथील पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला यात पवार कुटुंबियांच्या कर्ताधर्ता तरुण दगावला या दुःखामध्ये त्यांचे वडील किशन पवार यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक मदत केली व या संकटातून सावरण्यासाठी त्यांना धीर दिला व भविष्यामध्ये पवार कुटुंबियांना मदत करण्याचे संजय भोसीकर यांनी अभिवचन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *