प्राध्यापक व विभाग प्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा, जिल्हा. लातूर. हे आमचे सर्वांचे लाडके अण्णा . ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिद्ध व्याख्याते. सुप्रसिद्ध साहित्यिक.आदरणीय आमचे अण्णा. लसाकम या परिवर्तनवादी सामाजिक चळवळीचे महाराष्ट्राचे माजी प्रदेश अध्यक्ष,आमचे अण्णा. अवघ्या महाराष्ट्रमध्ये शिव, लहू, फुले-शाहू-आंबेडकर अण्णा भाऊ यांच्या विचाराचे सत्यवर्तन पाईक. त्यांचे विचार-आचार सर्व महाराष्ट्रामध्ये अज्ञानी- उपेक्षित आपल्या समाजाला पटवून सांगणारे समाजाचे मार्गदर्शक, आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, आधारवड आहेत. आधारस्तंभ आदरणीय अण्णा हे सामाजिक व शैक्षणिक कार्य करत असताना, फक्त आपल्या कुटुंब यांचाच विचार न करता आपल्या समाजामध्ये सर्वांच्या सुख-दुःखात, तन-मन-धनाने सामील होऊन आपल्या समाजाला वेळो-वेळी मार्गदर्शन करणारे. आमचे सर्वांचे लाडके अण्णा. आमचे सर्व सगे- सोयरे आमच्या अण्णांना दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजतात . तसेच सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर आहेत. आमच्या कुटुंबीयांचे आमचे अण्णा डॉक्टर आहेत.
त्यांनी दिलेला डोस आमचे सर्व फॅमिली मेंबर पूर्ण करून घेऊन वेळो-वेळी कामाला लागतात . नुसते ते वनस्पतीशास्त्र विषयाचे डॉक्टर नसून ते सर्व सामाजिक, राजकीय,शैक्षणिक आर्थिक विचाराचे व कुटुंबाचे डॉक्टर आहेत. सर्वांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आमच्या अण्णा मध्ये आहे. आमच्या घरामध्ये जवळपास पाच प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर काकू- अण्णा यांच्या संगोपणाने व मार्गदर्शनाने तयार झालेले आहेत. सामाजिक चळवळीमध्ये निष्ठेने, प्रेमपूर्वक काम करणारे. अनेक क्षेत्रातील सामाजिक कार्य करणारे अनेक कार्यकर्ते आमच्या अण्णांनी निर्माण केलेले आहेत. आपण स्वतः उपाशी राहून आपला समाज उपेक्षित आहे. याची जाणीव ठेवून समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे अण्णा. मला लढा मान्य आहे रडगाणे नाही. या विचाराचे पाईक आमचे अण्णा. आता सुद्धा त्यांचा संघर्ष चालूच आहे. समाजासाठी. अनेक प्रकारचे वैचारिक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत कारण आपला समाज कुठेतरी सुधारण्यासाठी प्रबोधनाचा प्रयत्न केला पाहिजे. या विचाराने प्रेरित होऊन – अनेक शोषण विरहित समाज निर्मितीचे मूलभूत व महत्त्वाचे विचार मांडण्यासाठी तयार आसतात . समाजामध्ये अमुलाग्र परिवर्तनाचे विचार, सर्व समाजामध्ये घरो-घरी पोहोचवण्याचे काम वैचारिक विचार मंथनाच्या, चिंतनाच्या ग्रंथ निर्मितीतील कार्यातून आणि गरज पडली तर आर्थिकही अशा वेगवेगळ्या पद्धतीने आमचे अण्णा मदत व मार्गदर्शन करीत असतात .
हक्क मागून मिळत नाही त्यासाठी झगडावे लागते. जगडण्यासाठी संख्येने शक्तिशाली असणारा आपला समाज मात्र कमकुवत व दुबळा ठरला जातो कारण जीव हा बकरीचा दिला जातो. सिंहाचा नाही. या विचाराने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करीत असतात. उपाशीपोटी राहून सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. सर्वांच्या सुखा-दुखात आर्थिक मदतीसह धावपळीतही कुटुंबासह सामील होतात. आमचे अण्णा, सर्वांच्या विचार करून समाज कुटुंब सुखी राहिले पाहिजे. या दृष्टिकोन नि संघर्षातून काही तरी नवे शिकले पाहिजे. या विचाराने धडपडत असतात. शिव – लहू- फुले -शाहू – आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांच्या परिवर्तनवादी विचाराचा वारसा सोबत घेऊन समाजाला दिशादर्शन नि मार्गदर्शन करण्याचे काम आमचे अण्णा सातत्याने करीत आहेत. त्यांच्या प्रेरणेमुळेच आमच्या नात्या-गोत्यात, महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी आणि सत्यवचनी विचाराने प्रेरित होऊन, आमच्या घरात सत्यशोधकी पद्धतीने एकूण दहा लग्न पार पडलेले आहेत.
आमच्यासाठी स्वाभिमानाची व सन्मानाची गोष्ट आहे. अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आमची जडण-घडण होत आहे म्हणूनच आमच्या नात्या-गोत्यातील सर्वच आम्ही परिवर्तनवादी चळवळीत जगत असतो.
अण्णा, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, आरोग्यदायी जीवन, सुख- समृद्धी, भरभराटीचे यश मिळो. आमच्यासाठी, समाजाप्रती आणि सामाजिक चळवळीप्रति जागरूक असणारे तुमचे मन, मेंदू. हृदय सतत धडधडत राहो. अशी मी महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करतो. अण्णा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक……….
किशोर भिवाजी वाघमारे, ‘शिक्षक’ श्री शिवाजी प्राथमिक शाळा, चिंचोली[प.क.] ता. कंधार जिल्हा. नांदेड 🙏🙏