मन्याडखोर्याच्या मातीतलं जानत व्यक्तिमत्त्व म्हणजे माधवरावजी पांडागळे ……. काँग्रेस पक्षातील राजहंस हरपला..!





काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुमचे अचानक जाणे.
  अस्वस्थ होतंय मन , तुमच्या त्या संघटन चातुर्याची व सामाजिक बांधिलकीची येतेय आठवण.... तुमचा तो लढवय्या बाणा, माझ्यावर असलेलं ते प्रेम,, साहेब तुमच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध दररोज दरवळत राहिल.

काकाजी, आज आपणास भेटणार होतो आपली विचारपूस काय करणार पण तुमच्या हाताची थाप पाठीवर माञ नक्कीच घेणार होतो.

साहेब, तुमचं ते स्मित हास्य, बोलण्यातील तो भारदस्त रूबाब, लढण्याची ती ताकद, पक्षातील एकनिष्ठपणा हे मी कसं विसरू.

तसे पाहता कंधार पंचायत समितीचे माजी सभापती, कंधार तालुका काँग्रेस कमेटीचे मा.अध्यक्ष अशा अनेक पदांच्या माध्यमातून समाजाची सेवा केली आहे.

या पदाच्या माध्यमातून व काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही अनेकानेक कामे करून एक आदर्श समाजापुढे रोवला आहे याची कल्पना आम्हाला आहे पण यापुढे याची उणिव कोण भरणार हाही प्रश्न आहेच…?

साहेब, तुम्ही उभ्या आयुष्यात आजतागायत वाडी-तांडा व गावपातळीवर निस्वार्थ भावनेने सेवा केली.

आपल्या सहवासातून मानवतेच्या शेतशिवारात समतेचे बिज रोवून सामाजिक, राजकीय व शैक्षणिक सारिपाठावर आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीने समाजात अधिराज्य गाजवलं ही साधी बाब नाही.

     मार्गदर्शक, समाजाचे खर्‍याअर्थाने भूषण, कल्पक विचारक, प्रगल्भ, जानते, स्पष्ट वक्ते, संयमी, अलौकिक निर्णय क्षमता असे अनेक बिरुदावली लाभलेले स्व माधवरावजी पांडागळे साहेब यांच ह्रद्यविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे..

साहेब, तुमच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना व पांडागळे परिवारासह माझ्यासकट सामान्य जनतेला हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो ही प्रार्थना..

काकाजीस,,, जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.
शोकाकुल :-
सतीश दगडोपंत देवकत्‍ते
तालुकाध्यक्ष, सो. मि. कंधार
7083573111
9325295772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *