आज रविवार पण माझ्यासाठी तो सोमवारच कारण घरात राहूनही शांत बसवत नाही.. झोपणं आम्हाला जमत नाही नवनवीन किडे डोक्यात आले कि कसं बरं वाटतं.. त्यांनीही वळवळ करावी आणि मीही…
सदाफुली बाराही महिने फुलते तिला सुगंध नाही आणि फुलही फार कोणाला आवडत नाही कारण जे कधीही उपलब्ध असतं त्याला किम्मत नसते .. माणसाचही तेच आहे पण अशावेळी आपण संभ्रमात पडतो कि नक्की कोणासाठी उपलब्ध रहावं आणि कोणाला नाही जमत असं सांगावं..कारण प्रत्येक व्यक्ती ही कधी ना कधी आपल्या उपयोगी आलेली असते किवा भविष्यातही येउ शकते पण मग उपयोगी आहे म्हणुन त्या व्यक्तीला अटेंड करायचे का ?? .. हा स्वार्थीपणाही होवु शकतो.. मग आपण काय करायचे ?? सतत प्रत्येकाबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करावी..
आपण सदाफुली सारखे जगायचं.. सदाफुली देवावरही वाहीली जात नाही.. ती विकत आणून रुजवावी लागत नाही कारण ती आपोआप कुठेही येते.. सुगंध नाही .. आकर्षित व्हावं असं तिच्याकडे काहीच नाही तरीही भगवंताने तिला या पृथ्वीवर आणलय . तिच्याकडे कोणी पाहिलं नाही म्हणुन ती नाराज होत नाही ती बाराही महिने फुलत रहाते आणि फुलण्याच्या त्याच्या गुणधर्माने ती माझ्यासारख्या रसिकतेला साद घालते .. अंगणात एका कोपऱ्यात आज ती मला दिसली आणि तिच्याशी बोलताना जाणवलं , कि ती युनीक आहे…तिच्यात असलेलं सौंदर्य इतरांकडे नाही पण तरीही इतर झाडांशी तिची कंपॅनिअनशिप आहे.. इतर झाडांनी तिला आपल्यात सामावून घेतले आहे..
आपल्या मित्रांच्या बाबतीतही असं होवु शकतं एकाच दिवशी एकापेक्षा अनेक मित्र भेटायला तयार असतात अशावेळी नक्की कोणाला भेटावं तर शक्य असल्यास एकत्र सगळ्याना भेटावं किवा प्रत्येक व्यक्ती गणिक आपल्याला सगळ्या गोष्टी ठरवता येतात पण तरीही मला एक वाटतं जी व्यक्ती इतर कामं बाजूला ठेवून आपल्यासाठी वेळ काढते त्या व्यक्तीसाठी सगळ्यात आधी वेळ द्यावा आणि आज कोणी नाही म्हणुन किवा आपल्याला वेळ आहे म्हणुन जी व्यक्ती आपल्याला भेटते त्या व्यक्तीला आपण आपल्या सवडीनुसार भेटावे.. याला परिमाण नक्कीच नाही .. म्हणून सदाफुलीसारखं असावं जी भगवंताची निर्मिती आहे तिच्यासाठी त्याने काहीना काही निर्माण केलेले आहेच . याचा कॅंसर साठी उपयोग होतो.. मधुमेह साठी उपयोगी आहे.. त्वचा आणि केसासाठी याचा उपयोग होतो.. त्याला सुगंध , सौंदर्य नसलं तरीही याचा खूपच उपयोग आहे.. माझ्या कृष्णाने प्रत्येकाला काहीना काही दिलय फक्त आपली नजर तिथपर्यंत पोहचत नाही .. आपल्याला वाटतं , अरे यार कसली आहे ही हिचा काय उपयोग ??.. किवा कसा रहातो हा याच्याकडून काहीही घडू शकत नाही पण तिच व्यक्ती नकळत असं काही देवून जाते कि त्यावेळी जाणवतं कि No one is useless , everyone is Useful..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

