कंधार ; प्रतिनिधी
कोरोणाची तिसरी लाट रोखण्यासाठी आम्ही सक्षम असून जनतेने कोणत्याही अफवावर बळी पडू नये न घाबरता कोविड-19 चे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे जेणे करून तिसरी येणाऱ्या लाटेला रोकवता येईल ही लस सुरक्षित आहे सर्व जातीधर्माच्या लोकांनी शंका न बाळगता ग्रामीण रुग्णालयात येऊन लसीकरण करून घ्यावे.
लसीकरण हेच आपला जीव वाचवू शकतो अन्यथा आपण काहीच करू शकत नाही लसीमुळे अनेक लोकांचे गैरसमज आहे की लसीमुळे मानवावर बरेच दुष्परिणाम होतात असे काही होत नाही सध्या लसीकरणाच्या वेग मंदावला आहे .
लोकांनी जर लस घेतली नाही .तर तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळेल. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एक दीर्घकालीन पर्याय आहे त्यामुळे 18 वर्षां पुढील सर्व महिलांनी व पुरुशानी लसीकरणाचा आग्रह धरावा व लसीकरण करून घ्यावा
कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे .त्यामुळे लसीकरणाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कोरोणा प्रतिबंधक लस ही संजीवनी आहे .कसलिही मनात भीती व शंका न ठेवता नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे .
तालुक्यात 1 फेब्रुवारी पासून कोरोणा प्रतिबंध लस शहरातील ग्रामीण रुग्णालय कंधार येथे लसीकरण मोहीम सुरू झाली .
पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली व 1 मार्च पासून दुसरा टप्पा सुरू झाला.दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षा वरील जेष्ठ नागरिक व 45 वर्षापुढील व्याधीग्रस्ताना लस देण्यात आली व 1 एप्रिल पासून लसीकारणांचा तिसरा टप्पा सुरू झाला.
तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षापुढील सर्व नागरिकांना लस देण्यात आली त्यानंतर 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरुवात झाली त्यानंतर दिव्यांग लोकांना लसीकरणास सुरुवात झाली आतापर्यंत फारशी अडचण आली नाही .शहरातील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत लसीसाठी पात्र असणाऱ्यांची संख्या 18 हजार 300 इतकी आहे आतापर्यंत कोविशील्ड आणि कोव्हँँसिन पहिला डोस- 8550 आणि कोविशील्ड आणि कोव्हँँसिन दुसरा डोस – 4631असे डोस
एकूण :- 13181 झाले आहेत.
तरी सुजाण नागरिकांना सूचित करण्यात येते की दि:-17 सप्टेंबर2021 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी हा महालसीकरण मोहीम ग्रामीण रुग्णालयात राबविण्यात येत आहे तरी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना इत्यादी कागदपत्रे घेऊन यावे व लसीकरण करून घ्यावे . कंधार येथील सर्व सुजाण जनतेनी महालसीकरण करून घेऊन सहकार्य करावे असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.आर.लोणीकर सर यांनी जनतेला आहवान केले आहे .
ग्रामीण रुग्णालयातील खालील कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून आपले कोविड लसीकरण करून घ्यावे.
1)आशिष भोळे
मो:-8390808082.
2)अरविंद वाटोरे
मो:-8793678274.
3)यशवंत पदरे
मो:-8888889819.
4)शंकर चिवडे
मो:-8888234010
5)लक्षमन घोरपडे
मो:-8208557194.
6)कांबळे दिलीप
मो:-7972041422.
आयोजक :-
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक
डॉ. एस.आर.लोणीकर सर.