नांदेड, दि. 14 एप्रिल :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे मोठया उत्साहात साजरी करण्यता आली. सदर कार्यक्रामाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहूल कर्डीले हे होते. तर प्रमुख पाहुणे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार व डॉ. सान्वी जेठवाणी होत्या. तसेच कार्यक्रमास परमपुज्य पैय्याबोधी भंत्तेजी व भिक्खू संघ श्रामणेर खुरगांव यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले.
तदृनंतर परमपुज्य पैय्याबोधी भंत्तेजी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशिल ग्रहण करुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी करुन उपस्थितांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या . तद्नंतर डॉ.सान्वि जेठवाणी यांनी उपस्थितांना मागर्दशन केले.
जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी अध्यक्षीय भाषण करुन उपस्थितांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांचे विचार आम्हाला प्रेरणादायी ठरतात असे मत व्यक्त केले. तृतीयपंथीय यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तृतीय पंथर्यासाठी किनरभवन लवकरात लवकर उभारण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेन असे आश्वासन त्यानी दिले.
यावेळी तृतीय पंथयांचे गुरु शेख फरीद मॅडम व सीवायडीए पुणे संस्थेचे मिलन लांबा तसेच डॉक्टर प्रशासकीय अधिकारी यशदा बबन जोगदंड उपस्थित होते. सदर कार्याक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचे हस्ते 40 ते 45 तृतीयपंथीयांना ओळख पत्र व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले .
समाज कल्याण विभागा मार्फत आयोजित सामाजिक सप्ताह अंतर्गत भारतीय संविधानाच्या प्रास्तावीकेचे नियमीत सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण नांदेड कार्यालया अधिनस्त शासकीय वसतिगृह व शासकिय निवासी शाळा येथे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा , लघुनाटय , पथनाटय चित्रकला तसेच वाचन-प्रेरणा उपक्रम घेवून इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तसेच श्रीमती सुजाता पोहरे , समतादूत जिल्हा प्रकल्प अधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली समातादूता मार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाटयाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. सदरील कार्यक्रमात सामाजिक समता सप्ताहाची सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी /कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले .सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पांपटवार यांनी केले तर अभार प्रदर्शन रामदास पेंडकर यांनी केले. सदर कार्यक्रमास कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध महामंडळाचे अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.