सामाजिक बांधिलकी जोपासणारे शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष – गणेशराव घोडके

सामाजिक बांधिलकी जोपासणारे शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव घोडके आहेत.
पानभोसी या छोट्या खेडेगावातून लोहा शहरात आपला गणेश फॅब्रिकेशन चा उद्योग व्यवसाय सुरू करून उत्कृष्ट लोखंडी दारे, टेबल खिडक्या,जाळी,गेट सह आदी उत्पादन ग्राहकांना माफक दरात देणारे ग्रहाकांच्या पसंतीस क्रमांक १ उतरलेले गणेशराव घोडके हे आपला उद्योग व्यवसाय यशस्वी संभाळत सामाजिक बांधिलकी जोपासत शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या विचारांना प्रेणीत होऊन शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर यांना प्रेरणास्थान मानून शिवा संघटनेत सहभागी होऊन मोठ्या जिद्दीने कामाला लागले शिवा संघटनेच्या अनेक मोर्चे,धरणे , आंदोलने , महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव या सहीत स सामाजिक, धार्मिक सहभाग नोंदविला गणेशराव घोडके यांची सक्रियता पाहून शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांनी गणेशराव घोडके यांना शिवा व्यापारी आघाडीचे लोहा तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.


शिवा व्यापारी आघाडीचे लोहा तालुका अध्यक्ष पदी सतत ५ वर्ष उल्लेखनीय कार्य केले त्यामुळे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांनी गणेशराव घोडके यांच्यावर नांदेड जिल्ह्याची जबाबदारी टाकून त्यांचे शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.


कोरोना व लाॅकडाऊन काळात गणेशराव घोडके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक गोर – गरीब नागरिकांना मदत केली.
नुकत्याच अहमदपूर येथे शिवा संघटनेच्या वतीने शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत कै. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमास लोहा शहरातून भव्य टू व्हीलर व फोर व्हीलर रॅली काढण्यात यशस्वी कामगिरी बजावली.


आज दिनांक १ सप्टेंबर रोजी शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव घोडके यांचा वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा शहरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे संतुलन राखा हा संदेश देत गणेशराव घोडके हे आपला वाढदिवस साजरा करणार असुन गणेशराव घोडके यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.


ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो त्यांच्या हातून समाजसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा


विलास सावळे
लोहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *