कंधार ; प्रतिनिधी
केवळ राजकारण करुन स्वार्थ साधणारे बरेच असतात.वरवरचे बेगडीपणा लपवण्याचा प्रयत्न करतात परंतु याला अपवाद फुलवळचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे हे आपवाद असून समाजसेवक म्हणून आजही ते प्प्रत्येकाच्या सुखदुखात सहभागी होतात.नुकतेच फुलवळ येथिल मुस्लिम बांधव शहाबुद्दिन पतुर साब शेख हे दवाखान्यातुन बरे होऊन आल्यावर शहाबुद्दिन यांच्या घरी जावून भेट घेतली व आस्थेवाईकपणे तब्येतीची चौकशी या माजी सरपंच दवकांबळे दांपत्यानी करत माणूसकीचे दर्शन दिले आहे.
आज भी माणूसकी जिवंत आहे माणसावर प्रेम करणारे माणसं पण जिवंत आहेत हे दाखवले आहे.
आपल्या वार्डात व आपल्या भागामध्ये सुखा दुःखत सामील होणारे नेतृत्व म्हणून माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे यांची ओळख आहे. तसेच तुळशीदास रामजी रसवंती उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय फुलवळ आणि उद्धव भुजंगा देवकांबळे-सामाजिक कार्यकर्ते फुलवळ यांनी आपले समाजसेवाचे कार्य आपल्या गावात चालवले आहे.
उदाहरण म्हणजे हसत खेळणारा माणूस म्हणजे शहाबुद्दीन शेख यांचा ऑपरेशन झाल्यामुळे माजी सरपंच बालाजी देव कांबळे यांनी आपल्या भागातील व्यक्ती ला सुखा दुःखामध्ये भेट घेण्यासाठी अनेक वेळा भेटीगाठी करत असतात तेच माणुसकी त्यांना येणाऱ्या कोणत्याही अडीअडचणीला ते मदत करतात लक्षपूर्वक नजर ठेवतात जनतेचे प्रेम खूप फार मिळते गेल्या पंधरा ते वीस वर्षां पासून सतत त्या भागातून निवडून येणारे नेतृत्व करणारा माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी भुजंगा देवकांबळे ग्रामपंचायत वार्ड क्रमांक च्यारच्या सदस्य सौ अनिता बाई बालाजी देवकांबळे शहाबुद्दिन पतुर साब शेख व त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस करून डॉक्टरांनी दिलेले औषध अगदी वेळेवर घ्यावा असा सल्ला देत काही घाबरायचं नाही असे धीर दिला.