कंधार : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आसून विविध कार्यक्रम कंधार सह तालुक्यात बूथनुसार घेण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवार दि १ रोजी ढाकू नाईक तांडा येथे संपूर्ण तांडा कोवीड लसीकरण 100% करून गावकऱ्यांनी पुढाकारानं यशस्वी केला अशी माहीती भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिली.
आज शुक्रवार दि १ रोजी ढाकू नाईक तांडा येथे कोवीड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लसीकरण शिबिरास गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन लस घेतली या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर पाटील डांगे भाजपा तालुका कार्यकारिणीचे सदस्य श्रीराम जाधव, व्यंकटराव नागलवाड आरोग्य विभागाचे डॉक्टर केदार बचाटे व त्यांचे सर्व सहकारी नर्स आरोग्य सेवक कर्मचारी उपस्थित होते .
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बालाजी जाधव ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पवार रंगनाथ जाधव विनोद राठोड, प्रकाश जाधव, गोविंद राठोड , गोपाल राठोड , शिवाजी राठोड तांड्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सर्व तांड्यातील नागरिकांनी सहभागी होऊन लसीकरण करून घेतल्याने तांडा 100% लसीकरण पूर्ण झाले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यासह गावकऱ्याचे आभार मानले.