कंधार ; प्रतिनिधी
तालुक्यासह राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत कायम करण्याचे निर्णय घेवून राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांना कायम करण्यात यावा व ग्रामरोजगार सेवक यांचे मानधन त्यांच्या वैयक्तीक खात्यावर अदा करण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी ग्रामरोजगार सेवक संघटना जिल्हा अध्यक्ष सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार येथे २ आॉक्टोबर रोजी उपोषण झाले.तालुका अध्यक्ष शिवाजी गायकवाड तालुका सचिव शेषेराव ढेंबरे यांनी पुढाकार घेतला.
2 आँक्टोबर रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त ग्रामरोजगार सेवक संघटना कंधार च्या उपोषणा स्थळी स्वतंत्र सेनानी मा.खा.भाई केशवराजी धोंडगे व नांदेड जि प सदस्य आँड.विजयभाऊ धोंडगे ,माझी सैनिक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष.बालाजी चुकलवाड ,काँग्रेस सोशल मीडिया सेलचे ता. अध्यक्ष तथा सरपंच सतिश देवकत्ते यांनी भेट दिली.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत रोजगार सेवकांची एकूण संख्या २८,१४४ एवढी असुन राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामसभेतून ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेव्दारे नियुक्ती करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार राज्यामध्ये सन २००६ पासुन आजतागायत राज्यात एकूण २८, १४४ रोजगारसेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून ६% मानधनावर कार्यरत असून सन २००६ पासून गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवक म्हणुन काम करतात.
पण प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पंचायत पॅनलच्या माध्यमातून नवीन सरपंच सदस्यांची निवड होते. पण राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये संत्तातर झाल्यावर सुडबुध्दीने ग्रामरोजगार सेवकांवर खोटया प्रोसिंडींग व्दारे कामावरून कमी करूण जाणीवपूर्वक अन्याय केला जातो.
त्यामुळे हि बाब अत्यंत गंभीर असून ग्रामरोजगार सेवकांना मानसिक त्रास होवून कोणत्याही निर्णयाला सामोरे जावे लागते त्यामुळे त्यांच्या कुंटूबाची पालन पोषणाची जिम्मेदारी कुंटूब प्रमुख म्हणून त्यांच्यावर असल्यामुळे त्यांच्या कुंटूबावर उपासमारीची वेळ येते. व आमच्या वर अन्याय होतो हे सत्य आहे.
राज्यातील एकुण २८,१४४ ग्रामपंचायत रोजगार सेवक यांना आपल्या स्तरावरून शासकीय सेवेत कायम करण्याचे निर्णय घेवून राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांना कायम करण्यात यावा व ग्रामरोजगार सेवक यांचे मानधन त्यांच्या वैयक्तीक खात्यावर अदा करण्यात यावे असे निवेदन यावेळी तहसिलदार यांना देण्यात आले.
यावेळी सुरेश राठोड यांच्यासह श्रीराम सिरशे,संभाजी काळम,संतोष कळकेकर,खंडोजी बोयवारे,राजाराम कानगुले,बळीराम रुंजे,संजिव आईतवाड,हुशेन शेख
शेषेराव ढेंबरे,मोहन कांबळे,रामदास गुट्टे,कोंडीबा भंडारे,हौसाजी कदम,उत्तम इबीते,विजय राठोड आदी उपोषण कर्त्यांची उपस्थिती होती.