कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या कंधार येथिल संपर्क कार्यलयात आज दिनांक ०२/१०/२०२१ रोजी साजरी करण्यात आली.
माजी आमदार
शंकर अण्णा धोंडगे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा संचालक कृ.उ.बा.स.राजकुमार केकाटे,युवक कार्यध्यक्ष संतोष कागणे,राजुभाऊ पांगरेकर,होनाजी अम्लापुरे,घोटकेकर मामा यांची उपस्थिती होती.