कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कंधार तालुका अध्यक्षपदी नवनाथ आईतवाड यांची निवड करण्यात आली. यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व नांदेड जिल्हाध्यक्ष श्री सुर्यकांत मारोती चिंतेवार यांनी नियुक्ती केली संघटना बळकट करण्यासाठी व मजबुतीसाठी संघटनेचे मुख्य ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून सर्व सामान्यांपर्यंत संघटनेचे काम पोहचविण्यासाठी हि निवड करण्यात आलेली आहे.
नवनाथ आईतवाड यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कंधार तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गोल्ला गोलेवार समाजातून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रा.सुभाष वाघमारे,एस.पी.केंद्रे,ग्यानेद्र चिंचोलीकर, मारोती बोडेवार,रामप्रसाद चुकलवाड,अनिल कोंडे,तुकाराम मुंडे, सचिन आईतवाड,चंद्रकांत मुंडे व कंधार तालुक्यातील ओबीसी महासंघ समाज बांधव उपस्थित होते.