कंधार प्रतिनिधी/
कंधार तालुक्यातील फूलवळ व पेठवडज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला जवळपास काही महिने शिल्लक आहेत असे असले तरी काही उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत कंधार तालुक्यातील फूलवळ व पेठवडज आरक्षण ओपन ला सुटणार असल्याची चर्चा सामान्य माणसामध्ये जोरदार चालू आहे
नावंद्याचीवाडी ता.कधार येथील सामाजिक कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेड कंधार तालुका अध्यक्ष नितीन पाटील कोकाटे यांनी संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून काम करत असताना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी सरकार च्या विरोधात लढा दिला व सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारा तरूण म्हनून नितीन पाटील यांची ओळख आहे.
फूलवळ व पेठवडज जिल्हा परिषद सर्कल ओपनला सूटले व पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवणार असल्याची घोषणा नितीन पाटील कोकाटे यांनी केली आहे.
फूलवळव व पेठवडज सर्कल ओपनला सुटण्याची शक्यता असल्यामुळे नावंद्याचीवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते सामान्य कुटूंबातील तरूण आपल्या काम करत असताना नितीन पाटील कोकाटे यांनी ज्या ज्या वेळी रक्ताची गरज भासली त्या वेळेस रक्तदान शिबिराचे आयोजन केले व सामाजिक उपक्रम करतं असतानाच जन सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा तरूण म्हनून नितीन पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे म्हणून नितीन पाटील कोकाटे हे निवडणूक लढवण्या विषयी घोषणा केली आहे.
गावच्या व परिसरातील भागाच्या विकासाच्या बाबतीत असलेली दूरदृष्टी युवा नेतृत्व गोरगरिबांसाठी धावून येणारा कार्यकर्ता म्हणून नितीन पाटील यांची ओळख झालेली आहे नांवद्याचीवाडी गावांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून तसेच करोना च्या काळात सेनिटायझर व मास्क वाटप केलं अडचणीच्या प्रसंगी रक्ताची गरज पूर्ण करणे परिसरातील सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाण्याचे काम नेहमीच नितीन कोकाटे यांनी केलेल आहे.
त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा व विकास मुख्य व्यक्ती निवडून आला पाहिजे ही भावना या भागातील सामान्य माणसाची बनली आहे परिसरातील सामान्यातील सामान्य माणसाला शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळून देणे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून कंधार तालुक्यातील सर्व समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा व कोरोणा योद्धा सन्मान सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिबिर आयोजित करून . तालुका स्तरीय जिजाऊ ज्ञान परिक्षा चे आयोजन असेल शेतकरयांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून 2020 मध्ये भव्य बैलगाडी मोर्चा चे नियोजन व वेळोवेळी निवेदना द्वारे सरकारला कंधार तालुक्यातील समस्या ची जाणीव करून देण्याचं काम करत आहेत.
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये अनुदान द्यावे यासाठी रस्ता रोको करून शासनाला शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी रास्ता रोको असेल सामाजिक कार्ययांच्या माध्यमातून व परिसरातील जास्तीत जास्त विकास कसा करता येईल याकडे प्राधान्य देणे जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर दखल घेऊन त्याचा पाठपुरावा करून त्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी व या भागात विकासाची गंगा आणण्यासाठी मायबाप जनतेच्या आशीर्वादाने संभाजी ब्रिगेड कडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणार असल्याचे नितीन पाटील कोकाटे यांनी सांगितले आहे.