उस्माननगर ते मुखेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची मुदत संपल्यानंतरही काम अपूर्णच ?होत असलेल्य निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करा : ओम पाटील शिंदे

कंधार  

उस्माननगर ते मुखेड या रस्त्यासाठी सार्वजनिक रस्ते विकास मंत्री नितींनजी गडकरी साहेब यांनी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या रस्त्याचे काम मुदतीमध्ये करण्याचे सार्वजनिक रस्ते विकास मंत्री नितींनजी गडकरी साहेब यांनी आदेश दिले होते. त्यामुळे आदेश देऊनही उस्मानगर ते मुखेड या जाणाऱ्या रस्त्याची मुदत संपल्यानंतर या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम गुत्तेदार रुद्राणी कंट्रक्शन मार्फत वरील रस्त्याचे काम करण्यात येत आहे त्यामुळे वरील रस्त्यावर बांधण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या फुलांच्या बांधकामास तडे गेले आहे व अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे होत आहे तरी अनेक ठिकाणी झालेल्या रस्ता कामांचीगुणवत्ता या कामावरूनच दिसून येत आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतरही वरील ठिकाणचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे.

मुखेड ते उस्माननगर हा रस्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्यामुळे भाजप सरकारच्या काळात सार्वजनिक रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी भारतातील प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत चांगले व उत्कृष्ट दर्जाचे रस्ते देण्याचा निर्णय त्याने घेतला होता त्याच प्रमाणे वरील रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते पण रुद्रानी कंट्रक्शन यांनी सर्व नियम धाब्यावर व सर्व अधिकाऱ्यांना हाताशी धरून काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाही याकडे मात्र अधिकारी कानाडोळा करत आहेत. 

यातून गुत्तेदार कन्ट्रक्शन दार शासकीय अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने करोडो रुपयांची माया गोळा करीत असल्याच्या भावना येथील ग्रामीण भागातील जनतेतून व्यक्त होत आहेत त्यामुळे वरील कामाची गुणनियंत्रण समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मराठा महासंग्राम संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री ओम पाटील शिंदे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सार्वजनिक रस्ते विकास मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे तरी वरील रस्त्याची तात्काळ चौकशी न केल्यास मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ओम पाटील शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने दिला आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *