जि.प.शाळेला माजी विद्यार्थांची भेट … शाळेच्या प्रगतीसाठी धडपडणारे राजीव तिडके सरच माझे आदर्श

लोहा


आज दिनांक 14 ऑगस्ट 2020, मी व माझे सहकारी मित्र प्रा. अनंत सरकाळे, माझे शालेय शिक्षक  राजीव तिडके सरांना जि. प. माध्य. व उच्च माध्य. प्रशाला लोहा जि. नांदेड येथे  भेटण्यासाठी गेलो होतो. वयोमानानुसार होणारा नैसर्गिक फरक जाणवला पण तोच किंबहुना पूर्वीपेक्षा जास्तच जोश, उत्साह,  विद्यार्थी व शाळेविषयी तळमळ. जि. प. शाळेला मूर्त स्वरूप सरांची अथक परिश्रमातून मिळाले.नेहमी हे मी फेसबुक वर पाहिले होते आज स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतला . स्वतः च्या शाळेचेच नाही तर इतरही जवळपासच्या शाळेत जाऊन तिथेही परिवर्तन करण्याचा कसोशीने प्रयत्न सर करतात. 


विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायलाच पाहिजे त्यासोबत शाळा पण दर्जेदार व्हायला हवी त्यासाठी शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला हवे त्यासाठी स्वतः ची पगार शाळेच्या विकास कामासाठी त्यांनी दिलीच पण त्यासोबत सामाजिक संघटना व शाळेविषयी तळमळ असणाऱ्यांच्या मदतीने शाळेला आज मूर्त रूप दिले.शाळेचे क्षेत्रफळ जरी कमी असले तरी सर्व काही व्यवस्थित. सर्व वर्ग खोल्या, ऑफिस, विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनग्रह,मैदान, जवळपास 300 झाडांचे वृक्षारोपण सुंदर अशी परसबाग त्यातील विविध फळभाजी झाडे इ. विशेषकरून सरांच्या स्वभाव व त्यांचे सहकारी सर्वच शाळेच्या प्रगतीसाठी धडपडणारे. सकाळी 7 ते सायांकाळी 7 पर्यंत शाळेतच विविध शाळेच्या कामानिमित्त शाळेतच उपस्थित राहून शाळेच्या प्रगतीसाठी धडपडत असतात आजही मी सायंकाळी 4 वाजता शाळेत गेलो असता ते त्यांच्या शाळेच्या कामात व्यस्त होते. खूप वर्षा नंतर भेट झाल्याने त्यांना झालेला आनंद आजही माझ्या डोळ्यात ताजा आहे.

यासोबतच आपले गाव व शाळा (जि. प. प्रशाला कामारी ता.हिमायतनगर जि. नांदेड) बाबत आपुलकीने विचारणा करत होते शाळेत असतानाच्या आठवणी त्यावेळी गावातील नागरिक,  प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी त्यांना असणारी शाळेची ओढ , प्रति कामारी गावातील सर्व नागरिकांना असणारा आदर शाळेने स्काऊट गाईड चळवळीत राज्य पुरस्कारापर्यंत मारलेली मजल ,मलाही राज्यपुरस्कार सरांच्याच मार्गदर्शनाखाली मिळाला, नांदेड आकाशवाणीवर सरांनी केलेले शाळेचे प्रतिनिधित्व , कामारी येथे लोकसहभागातून उभारलेली श्रमदान चळवळ व त्यामध्ये सामील झालेले सर्व गावकरी यासह विविध बाबीवर बोलत असताना गावातील नागरिक व विद्यार्थ्यांसोबत असणारा त्यांचा घनिष्ठ  संबंध प्रतीत होत होता.

कामारी येथील शाळेची पूर्वीची प्रतिष्ठा व आज असलेली परिस्थिती यावर सर्वांनी मिळून काम केले पाहिजे व कामारी गावाला असलेली शैक्षणिक परंपरा वृद्धिंगत व्हायला पाहिजे. त्यासाठी कधीही हजर असेल  असा आशावाद दिसून आला.मी सरांचा व  त्यावेळी मला लाभलेली सर्व गुरुजन  यांचा मी शतशः ऋणी आहे, सर आपले  कार्य असेच वृंद्धिगंत होवो व आपल्या सहवासामुळे शाळा व विद्यार्थी यांचे जीवन समृद्ध होवो या शुभेच्छा  सर…

आपलाच विद्यार्थी

प्रा. संदिप मारोतराव देवराये
रसायनशास्त्र विभागप्रमुख 
कै. र.व.महाविद्यालय सोनपेठ जि. परभणी(कामारी,ता.हि. नगर जि. नांदेड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *