राष्टीय पात्रता प्रवेश चाचणी’ (NEET) पात्र झाल्यानंतर वैद्यकिय अभ्यासक्रमाच्याप्रवेशाचा विभाग निहाय ७०:३० नियम रद्य करण्याची मागणी


कंधार ; मिर्झा जमीर बेग

“राष्टीय पात्रता प्रवेश चाचणी”(NEET)मध्ये पात्र झाल्यानंतर वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मागील अनेक वर्षापासुनमहाराष्ट्रात विभाग निहाय ७०:३० टक्के वाटा हे सुत्र राबविले जाते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणिमराठवाडा असे ३ विभाग करुन उर्वरीत जागासाठी ७० टक्के वाटा यानुसार वैद्यकिय अभ्यासक्रमासाठीप्रवेश दिला जातो.त्यामुळे विभाग निहाय ७०:३० नियम रद्य करण्याची मागणी दि.१७ रोजी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आली आहे.

वास्तविक पाहता मराठवाडा विभागाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागातवैद्यकिय महाविद्यालये व वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या जागाची संख्या किती तरी पटीने जास्त आहे.त्यामुळे मराठवाडयातील शेकडो होतकरुन विद्यार्थ्यावर अनेक वर्षापासुन अन्याय होत आहे मराठवाडयाच्यातुलनेत विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात वैद्यकिय महाविद्यालये जास्त आहेत. ३० टक्के जागामध्ये त्या, त्याविभागाचे जास्त गुण घेणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो म्हणजे मराठवाडयातील विद्यार्थ्यांनाजास्त गुण असले तरी मराठवाडा सोडुन इतर ठिकाणी प्रवेश मिळतच नाही परिणामी डॉक्टरबनण्याचे स्वप्न पाहणा-यया मराठवाडयातील शेकडो विद्यार्थ्यावर अनेक वर्षापासुन अन्याय होत आहे.

सदरिल प्रकारचे ७०:३० टक्के सुत्र भारतातील कोणत्याही राज्यात राबविले जात नाही.त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी  मराठवाडातील विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.या निवेदनावर माजी प.स.सदस्य प्रा.माधव गित्ते ,कॉग्रेस तालुका  मिडीया सोशल प्रमुख  सतिश देवकत्ते ,सतिश नळगे ,रुषीकेश बसवंते,स्वप्नील परोडवार ,गंगाधर कहाळेकर आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *