ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथील प्रा.एस.बाबाराव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

मुखेड -ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.एस.बाबाराव यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ( PROTAN) विंगच्या वतीने त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय ‘राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार’ सन २०२०-२०२१ साठीचा दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी आकाश फंक्शन हॉल नांदेड येथे

नांदेड उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.विठ्ठल मोरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील रसायनशास्त्र संकुलाचे संचालक प्रा.डॉ.भास्कर दवणे, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक नंदनजी नांगरे, महाराष्ट्र राज्य मुख्य संयोजक तक्रार निवारण समिती प्रोटानचे प्रा. डॉ. मोहन मिसाळ व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदरील पुरस्कारात शाल,बुके, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती मंगलाताई बाबाराव यांनी हा पुरस्कार स्विकारला.


त्यांच्या या पुरस्कार निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड साहेब, संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य गंगाधर रावजी राठोड, मुखेड कंधार विधानसभा परिक्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड,संस्थेचे सदस्य तथा जि प सदस्य संतोष भाऊ राठोड, संस्थेचे सचिव गोवर्धनजी पवार,संस्थेचे सदस्य मुख्या. गोविंद पवार,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड,माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने,माजी प्राचार्य डॉ.देविदास केंद्रे,स्टाॅफ सेक्रेटरी प्रा. डॉ.व्यंकट चव्हाण,सहस्टाॅफ सेक्रेटरी प्रा.सौ.शिल्पा शेंडगे,प्रा.डॉ.उमाकांत पदमवार,प्रा.सूभाष कनकुटे,प्रा.शंकरय्या कळ्ळीमठ, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आप्तेष्ट,मित्र परिवार व विद्यार्थी विद्यार्थीनींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *