धर्माबाद येथे २ कोटी ५६ लाख रुपयाचा नीधी खर्चून मुस्लीम धर्मीयांसाठी शादीखाना होणार;नगराध्यक्ष अफजल बेगम अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाला यश

धर्माबाद : प्रतिनिधी

धर्माबादमध्ये मुस्लीम धर्मीयांसाठी स्वतंत्र शादीखाना असावा ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.विद्यमान नगराध्यक्ष अफजल बेगम अब्दुल सत्तार यांनी विशेष प्रयत्न करुन हा शादीखाना मंजूर करुन आणला.

        २ कोटी ५६ लाख रुपये खर्च करुन धर्माबाद मध्ये मुस्लिम धर्मीयांसाठी भव्य शादीखाना बांधला जाणार आहे.सोमवारी दि.१५ नोव्हेबर रोजी नगराध्यक्ष अफजल बेगम यांच्या हस्ते भुमीपुजनाचा कार्यक्रम ही संपन्न झाला.

या प्रसंगी विद्यमान उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थितीत होते.

           महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धर्माबाद शाखेने यावर आक्षेप घेतला असून शासनाचा निधी खर्च करुन एकाच धर्मीयांसाठी शादीखाना का बांधला जात आहे? असा प्रश्न उपस्थितीत करुन या मॕरेज हॉलला कोणत्याही महामानवाचे नाव देऊन तो सर्व धर्मीयांसाठी खुला करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

                यामुळे भुमीपुजनाच्या मुर्हतावरचं मनसेने आक्षेप घेतल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळत आहे.

धर्माबाद शहरात भिन्न – भिन्न धर्माचे आणि अठरा पगड जातीचे  लोक राहतात.अन्य कोणत्याही धर्मीयांसाठी नगर परिषदेने अशा हॉलची तरतुद केली नाही.माञ नगरपरिषदेतील सत्ताधारी विशिष्ट धर्माचीच का काळजी घेत आहेत हे एक कोडचं आहे.

       एक तर सर्व धर्मीयांसाठी व जातींसाठी हे फंक्शन हॉल खुले करा.अन्यथा सर्वांनाच स्वतंत्र असे हॉल बांधून द्या.अन्यथा मनसे या विरोधात आक्रमक भुमिका घेईल असेही त्याने जाहीर केले.

या निवेदनावर मनसे शहर प्रमुख सचिन रेड्डी चाकरोड,    
नारायण पाटील पवार,संजय पवार,नरसिंग पाटील नरवाडे,दत्तात्रेय पाटील कावडे , गजानन मुडेवार, सतिश माळगे,रामेश्वर गंदलवार, सज्जन गडोड,मनोहर मुळे, कृष्णा सुर्यवंशी, राहुल बोधनकर, सुगध पहवलान , नानक सिंग ठिलो,
यांच्या स्वाक्षरी आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही विशिष्ट धर्माचे अनुनय केलेले सहन करणार नाही.नगर परिषदेतील सताधा-यांना अन्य धर्मीयांची,अठरा पगड जातीतील लोकांची काळजी नाही का? त्यांचे मतदान यांना चालते तर मग यांना सुविधा का नाहीत?ह्या  शादीखान्याचे नाव बदला व
सर्व धर्मीयांसाठी खुले करा.अन्यथा मनसे गप्प बसणार नाही.

सचिन रेड्डी चाकरोड
मनसे शहरप्रमुख,धर्माबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *