शिवणी जामगा येथील ग्रामसभेचे तहसीलदार कारखाना व्यवस्थापक ,पोलीस स्टेशन लोहा, यांच्याकडे मागणी—-
लोहा प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील शिवणी जामगा येथील धाराशिव साखर कारखान्यात धुराड्यातून. काळे धुळ कण पडत असल्यामुळे गावातील व शेतातील शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर, भाजीपाला पिकावर काळे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस काळा पडत असून गावातील घरावर छतावर काळे थर पडत असल्यामुळे गावातील जनतेला श्वासोच्छ्वासाच्या बिमारी ची लक्षणे दिसत आहेत.
त्यामुळे गावातील जनतेने ग्रामपंचायत कडे तक्रार केल्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन धाराशिव साखर कारखाना शिवणी जामगा येथील धुराड्यातून काळे धुळकण ताबडतोब कारखान्याच्या व्यवस्थापक मंडळाने बंद करावेत असा ठराव सर्वानुमते संमत करून व गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या करून संबंधित ठराव तहसील कार्यालय लोहा ,कारखाना व्यवस्थापक मंडळ , शिवणी जामगा व पोलीस स्टेशन लोहा यांना पुढील कार्यवाही स्तव सादर करण्यात आला, सदरील काळे धुळ कण सात दिवसांमध्ये बंद करण्यात यावेत अशी मागणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने व ग्राम सभेच्या वतीने करण्यात आली आहे
कारखान्याच्या चेअरमन अभिजित पाटील यांनी या बाबीची दक्षता घेऊन सदरील काळे धुळ कण ताबडतोब दक्षता घेऊन काळे धूळ कण बंद करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.