हिमायतनगर पळसपुर डोल्हारी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन खासदार हेमंत पाटिल, आमदार जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न

खासदार हेमंत पाटिल यांनी केला होता पाठपुरावा

हिमायतनगर –

खासदार हेमंत पाटिल यांनी पाठपुरावा करून मंजुर करून आनलेल्या हिमायतनगर – पळसपुर – डोल्हारी – सिरपल्ली रस्त्याच्या कामाचे उध्दघाटन खासदार हेमंत पाटिल, आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या हस्ते दि. १३ रवीवारी संपन्न झाले.

हिमायतनगर पळसपुर डोल्हारी हा रस्ता २००८-०९ मध्ये तत्कालीन केंद्रीय ग्राम विकास मंत्री सुर्यकांताताई पाटिल यांच्या माध्यमातुन पंतप्रधान ग्राम सडक योजनेत करण्यात आला होता, तेंव्हा पासुन या रस्त्यावर बाधकाम विभागाने मुरूमाचे एक टोपलेही टाकले नाही किंवा डागडुजी केली नव्हती, हिमायतनगर – उमरखेड ढाणकी मार्गे जाण्यासाठी हा रस्ता जवळचा असल्याने मराठवाडा तेलंगाना दोन राज्यांना जोडतो त्यामुळे नेहमी वाहनांची ये जा सुरू असते.

रस्त्याकडे कोणीही लक्ष न दिल्याने चाळण झालेल्या मार्गावर पायी चालणे अवघड बनले होते, पावसाळ्यात दुचाकी चालकांनी अक्षरश: बैलगाडीतुन मोटार सायकल उचलुन नेल्याचे अनेकांनी अनुभवले, साधारन पाऊस झाला तरी हिमायतनगर डोल्हारी ढाणकी मार्गावर वाहने चालवता येत नव्हती.

रस्त्याच्या समस्ये पासुन सुटका व्हावी, यासाठी पळसपुर येथिल ग्रामस्थांनी खासदार हेमंत पाटिल यांचेकडे रस्ता करून देण्याची मागणी केली होती, तात्काळ खासदार हेमंत पाटिल यांनी कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नांदेड यांना २३ डिसेंबर २०१९ ला पत्र देवुन रस्ता कामाचे अंदाज पत्रक करण्यास कळविले होते, आता या रस्ता कामाला मंजुरी मिळाली, त्याचा दि. १३ रविवारी खासदार हेमंत पाटिल, आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले. असुन पंतप्रधान ग्राम सडक योजनेतुन १२ कि.मी. अंतरासाठी आठ कोटी दोन लाख रूपयाचा निधी मंजुर केला आहे.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते जाकिर चाऊस, राजेश फुलारी, उपजिल्हा प्रमुख रमेश घंटलवार, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, उपशहर प्रमुख प्रकाश रामदिनवार, जिल्हा युवाधिकारी कृष्णा पाटिल आष्टीकर, जिल्हा समन्वयक विशाल राठोड, मा.नगराध्यक्ष कुणाल राठोड, मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी, कृऊबा सभापती डॉ. प्रकाश वानखेडे, माजी सभापती विठ्ठलराव वानखेडे, मदनराव पाटिल,कोंडबाराव कदम, विलास वानखेडे, विठ्ठल ठाकरे, सुभाष शिंदे, राजेश जाधव, आदिवाशी सेनेचे सत्यवृत्त ढोले, किसान सेनेचे प्रकाश जाधव, तालुका संघटक संजय काईतवाड, उपशहर प्रमुख राम नरवाडे, चेअरमन प्रविण शिंदे, साईनाथ देशमवाड, संचालक बाळुअण्णा चवरे, सरपंच मारोती वाडेकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनिल पतंगे, चादराव वानखेडे, शाहिर रामराव वानखेडे, नागोराव शिंदे, अमोल धुमाळे, विपुल दंडेवाड, राजेश पाटिल पिपरीकर, दत्तराव वानखेडे, उपकार्यकारी अभियंता सुधिर पाटिल यांचेसह शिवसैनिक, कॉंग्रेस कार्यकर्ते, यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *