वॉचमॅन ते पोलीस उपनिरीक्षक यश मिळवणाऱ्या गोपीनाथ केंद्रे सह निळकंठ गिते यांचा शेकापूर येथे संभाजी केंद्रे यांच्या वतीने सत्कार

कंधार

माळाकोळी येथिल गोपीनाथ केंद्रे यांची नुकनीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली तसेच सोमठाणा येथिल निळकंठ संग्राम गिते यांची पण पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली त्याबदल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव पाटील केंद्रे व सचिव शिवाजीराव केंद्रे याच्या कडून आज सोमवार दिं 14 मार्च रोजी सत्कार करण्यात आला

नवनियुक्त माळाकोळी येथिल गोपीनाथ केंद्रे यांची नुकनीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली त्यांनी मुंबई येथे सात वर्षे वॉचमॅन म्हणून बेस्टमधे काम केले . काम करत अभ्यास करून 2019 ला परीक्षा दिली होती त्यांचा निकाल 8 मार्च 2022 रोजी लागला असून महाराष्ट्रात 32 व्या क्रमाकाने त्यांना यश प्राप्त कले .

तसेच सोमठाणा येथिल निळकंठ संग्राम गिते यांनी पण त्याच परीक्षेत 39 वे स्थान मिळवले . विशेष म्हणजे निळकंठ गिते यांनी अभियांत्रीकी शिक्षण घेतले होते . गरीबीवर मात करत त्यांनी देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून यश प्राप्त केले .

या कार्याची दखल घेवून शेकापूर येथे सत्कार करण्यात आला . यावेळी सोमठाणा सरपंच बालाजी गित्ते, पोलीस पाटील संग्राम गित्ते , रामेश्वर गित्ते , प्राचार्य धोंडीबा नागरगोजे , तिरुपती गिते यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *