लोहा ; विनोद महाबळे
तालुक्यातील सुनेगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ऑनलाइन शिक्षणासंबंधी सुनेगाव केंद्रांतर्गत मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न झाली.
केंद्रातंर्गत पांगरी व वाळकेवाडी येथील जि.प. शाळांची निवड करण्यात आल्याबद्दल या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, शिक्षणविस्तार अधिकारी सौ.सरस्वती अंबलवाड, केंद्रप्रमुख डी.आर.शिंदे ,
केंद्रीय मुख्याध्यापक पंदलवाड, सुनेगावचे शिक्षणप्रेमी नागरीक बी.डी.जाधव, शिक्षक काँग्रेसचे नेते विठू भाऊ चव्हाण, अखिलचे जिल्हा उपाध्यक्ष मुर्तूज शेख यांची उपस्थिती होती.
सुनेगाव येथे दि.२२ आॅगस्ट रोजी जि.प.केंद्रिय प्राथमिक शाळेत गणेश चतुर्थी असतांनाही गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन शिक्षण या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सोनटक्के यांना प.स. लोहा येथे एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुनेगाव संकुलाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सुनेगाव केंद्रातील उत्कृष्ट शाळा मुख्याध्यापक म्हणून जि.प.प्रा.शाळा पांगरीचे मुख्याध्यापक बट्टलवाड , जि.प.प्रा.शाळा वाळकेवाडीचे मुख्याध्यापक जी.पी.चव्हाण यांचा गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या बैठकीत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आँनलाईन शिक्षण, समायोजन, शाळा भेटी प्रपत्र, इतर प्रशासकीय माहीती याबद्दल आढावा घेतला.
बैठकीचे सुत्रसंचलन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशीनाथ शिरसीकर यांनी केले तर आभार शेख मुर्तूज सर यांनी मानले. बैठकीला केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षक उपस्थित होते. कोरोना काळात अनेक शाळा ऑनलाइन शिक्षण प्रसाराचे चांगले काम करीत आहेत
. या पार्श्वभूमीवर गटशिक्षणाधिकारी यांनी अशा शाळांचीही दखल घ्यावी अशी चर्चा शिक्षकांतून होत आहे.