परभणी येथे”लसाकम”ची विभागीय बैठक संपन्न.

नांदेड ; प्रतिनिधी

मंगळवार दिनांक १० मे २०२२ रोजी परभणी येथे क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ “लसाकम” ची विभागीय बैठक मराठवाडा अध्यक्ष इंजिनीयर अण्णासाहेब तोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि “लसाकम” चे प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय गायकवाड,महासचिव गुणवंत काळे,सदस्य नोंदणी प्रमुख प्रा. डॉ. दयाराम मस्के,राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्याची विभागीय बैठक संपन्न झाली.


या बैठकीत संघटना वाढ, विविध उपक्रमांविषयी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजी टोम्पे, मल्हारराव तोटरे,नांदेड जिल्हा सचिव प्रा.डॉ.अशोक झुंजारे,हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉ. माधव मानमोठे, हिंगोली जिल्हा सचिव नरसिंग सूर्यवंशी,परभणी जिल्हा कार्याध्यक्ष वामनराव अवचार, सचिव अशोक गायकवाड या यासह परभणी येथील अनेक पदाधिकारी या विभागीय बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *