अहमदपुर ( प्रा भगवान आमलापुरे )
गोर बंजारा साहित्य संघ आयोजित तीसरे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन नुकतेच दि. २८, २९ मे० २२ रोजी वाशीम येथे पार पडले. या साहित्य संमेलनात कवी ( सर्जनसामर्थ्य ज्याच्यात आहे तो कवी असे म्हटले जाते. कवी या शब्दाच्या मुळाशी असलेल्या ‘ कु ‘ धातूचा अर्थ ,’ शब्द करणे ‘ असा आहे.शब्दांच्या द्वारा जीवन सौंदर्याची प्रतिसरष्टी उभी करणे, असेही या संदर्भबंधात म्हणता येईल. म्हणूनच कविता ही विद्यमान जीवनवास्तवाच्या उणीवापासून मुक्त असते. कविता या अर्थाने जीवनातील अपुर्णांचे अधोरेखन करून सौंदर्यवास्तू उभी करत असते. ) संदर्भ : कवी आणि कविता ; यशवंत मनोहर,एन. डी. राठोड यांच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चीत ‘ लोकशाही ‘ या पहिल्या – वहील्या स्वतंत्र कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शब्ददान प्रकाशन नांदेडने प्रकाशनासाठी सज्ज केलेल्या या कविता संग्रहात यापूर्वी विविध मासीकं आणि प्रातिनिधिक कविता संग्रहात प्रकाशित एकूण ३१ कवितांचे संकलन आहे. डॉ. विलास ढवळे नांदेड यांचा अभिप्राय आणि पाठराखण कविता संग्रहास लाभले आहे.
स्वागताध्यक्ष तथा जिल्हा परिषद वाशीमचे माजी अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन नामा बंजारा यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, आ. इंद्रनील नाईक, स्वागताध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष दिलीपराव जाधव, मुख्य आयोजक मनोहर आर चव्हाण, डॉ. गणपत राठोड, सुरेश जाधव, महंत संजय महाराज पोहरादेवी आदींच्या हस्ते विविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे आणि कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी इंजि.जि.के.चव्हाण, संपादक अविनाश चव्हाण, श्रावण राठोड, भगवान आमलापुरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.