जिल्ह्यात एकाच दिवशी 84 ठिकाणी
बचतगट व शेतकऱ्यांनी घेतला लाभ
▪️जिल्ह्यात एकाच दिवशी 84 ठिकाणी
बचतगट व शेतकऱ्यांनी घेतला लाभ
▪️जिल्हा प्रशासन व बँकांनी दिला कर्तव्य तत्परतेचा प्रत्यय
प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना व बचतगटांना कर्ज मिळावे यादृष्टीने मागील आठवड्यात जिल्हा प्रशासन व बँक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक दिवसीय शिबीर घेण्याचे निर्देश दिले होते. प्रत्येक तालुक्यातील संबंधित बँका, तहसिल कार्यालय, तलाठी, गटविकास अधिकारी आणि त्या-त्या गावातील शासनाच्या प्रतिनिधींनी संपूर्ण जिल्हाभरात आज 84 ठिकाणी हे शिबीर आयोजित करून शेतकऱ्यांना व बचगटांना पात्रते प्रमाणे पीक कर्ज दिले.
लिड बँक मॅनेजर अनिल गचके यांनी जिल्ह्यातील 23 बँकांच्या समन्वयातून संपूर्ण बँक अधिकाऱ्यांना विश्वास दिला. आजच्या शिबिरात या बँकेच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टीकोन घेत ही मोहिम यशस्वी करून दाखविली. येत्या 15 दिवसात जास्तीत जास्त पीक कर्जाचे नूतनीकरण करण्याचा निर्धार बँकांतर्फे व्यक्त करण्यात आला आ