फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
फुलवळ ता.कंधार येथे श्री बसवेश्वर विद्यालय शाळा , जि.प. शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी आज ता. २१ जुन रोजी जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या जागतिक योग दिनी उपस्थित विद्यार्थ्यांनी संगीतमय वातावरणात योग प्राणायाम करत शारीरिक कवायती केल्या.
यावेळी श्री बसवेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थी , मुख्याद्यापक , सर्व शिक्षकवृंद , जि.प. शाळेतील सर्व विद्यार्थी , मुख्याध्यापक , शिक्षकवृंद , मिनी अंगणवाडील सर्व विद्यार्थी , अंगणवाडी कार्यकर्ती यावेळी उपस्थित होते .