आज-काल पर्यावरणाच्या रक्षणासाठी हरित क्रांतिची गरज असतांनाच आमच्या जातभाईची लागवड कंधार येथील हरित कंधार परिवाराच्या वतीने मामडे ज्वलर्सचे शिवाभाऊ मामडे साहेब व त्यांच्या सहकार्यानी दिवस १ जुलै २०१७ रोजी कंधार शहरातील ऐतिहासिक महाराणा प्रताप चौकात कार्यक्रमाची सुरुवात झाली. !!हरित क्रांतिचा!!उपक्रम हाती घेतला आहे.पहिल्यांदा सप्तपर्णि वृक्षांची लागवड केली.तर गेल्या वर्षी फळझाडांचे नोंदणी करुन मोफत फळझाड वाटप करुन कंधार नगरीत उदासीन वातावरण असताना ही हा स्तूत्य उपक्रम हाती घेवून हरित क्रांतिची मुहूर्तमेढ रोवली.
याही वर्षी हरित कंधार परिवार मौ.पांगरा ग्रामच्या शिवारात वृक्षारोपण करुन दिवंगत कृषिकोहिनुर वसंतरावजी नाईक यांना स्मरुन राज्य शासनाने सुरू केलेल्या उपक्रमात सहभागी होवून १ जुलै २०२२ रोजी १० वाजता. माझ्या जतीच्या, मित्रांच्या,
सग्यासोयर्यांचे,वृक्षवल्ली रोपट्याला रोपण करुन कंधार हरित करण्यासाठी युवाशक्ती सरसावली शिवा मामडे सर .आपल्या टिमचे मनस्वी अभिनंदन! मी जरी वाळूनकोळ झालो तरी माझ्या एकट्याची उणीव या असंख्य वृक्षलागवड करुन भरपाई होणार! याचा मनोमन आनंद वाटतोय.
या कामी कंधार नगरीची नगरपालिका सहभागी आहे याचा मनस्वी आनंद होतोय! मला मोठे होतांना नगर परिषद माझी तहान भागवणार आहे.खरच हा स्तूत्य उपक्रम यशस्वी होणार यात शंका नाही! माझा र्हास हा काय कोणी एकट्याने केलेला नसून सर्वांनी मिळून केला आहे.तेव्हा सर्वांनी मिळून माझे रक्षण केले पाहिजे.
या कामी कंधार नगरीतील पत्रकार बांधवांनी या उपक्रमास प्रसिद्धी देवून मोलाचे कार्य केले त्या बद्दल पत्रकार बांधवांचे अभिनंदन आपण सर्वांनी आर्थिक व ईतर कोणत्याही प्रकारची मेहनत या उपक्रमास देणार्यां सर्वांचे मनापासून आभार !!वृक्षवल्ली आम्हा सोयरे!! खरचं या सोयर्यांची लागवड करतांना आपण सर्व उपस्थित राहून साह्य करावे.ही विनंती! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार