ग्रामपंचायत पाटोपाट सेवा सहकारी सोसायटीवरही राष्ट्रवादीचे प्रा. डॉ. श्रीपतराव पवार यांचेच वर्चस्व.


नांदेड: प्रतिनिधी


शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेड येथे कार्यरत प्रा. डॉ. श्रीपतराव पवार यांनी हंगरगा ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर सेवा सहकारी सोसायटीवरही ताबा मिळवल्याने प्रा.डाॅ. श्रीपतराव पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


प्रा. डॉ. श्रीपतराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांचा नांदेड तसेच लातूर जिल्हाभर नावलौकिक आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व शिक्षणमंत्री कमल किशोर कदम यांचे ते कट्टर समर्थक व विश्वासू कार्यकर्ते म्हणून जिल्हाभर त्यांना ओळखले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, डॉ. सुनील कदम, लातूर जिल्हा राष्ट्रवादीची काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी मुखेड तालुका शहराध्यक्ष पद स्वीकारुन पक्षबांधणीसाठी त्यांचे जिल्ह्यात भरीव योगदान राहिलेले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचे खूप मोलाचे योगदान राहिलेले आहे. बँक निवडणुकीतही त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी पक्षाने दिलेली होती हे विसरता येणार नाही.

मुखेड तालुक्यासह जिल्हाभर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी केलेली आहे. कार्यकर्त्यांशी त्यांचा अफाट जनसंपर्क असल्यामुळे त्यांचा गावागावात चाहतावर्ग मोठा निर्माण झालेला आहे. त्यांच्या अफाट जनसंपर्काचा पक्षाचा फायदा त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळून आपल्या गटाचा सरपंच केला तर नुकत्याच संपन्न झालेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शिवाजी अंकुशराव पवार यांची निवड केली. शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व सदस्य प्रा. श्रीपतराव पवार यांनी निवडून आणल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रा. डॉ. श्रीपतराव पवार यांचा नुकताच सत्कार केला. सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्यांमध्ये श्रीराम पवार, त्रिवेणी पवार, पार्वती पवार, रामो श्रीवंत पवार, विश्वनाथ दत्तात्रय पवार, प्रदिप ग्यानोबा पवार, पार्वती संभाजी पवार, उत्तम जोहारे, मनोहर जळबा जोहारे, कमल विठ्ठल पवार यांचा समावेश आहे. यावेळी शिवाजी निवृत्ती पवार, विजय पवार ,प्रमोद पवार, विश्वंभर पवार यांचेही प्रा. डॉ. श्रीपतराव पवार यांना भरीव सहकार्य मिळालेले आहे. या यशाबद्दल सर्वस्तरातून प्रा. डॉ. श्रीपतराव पवार यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *